Crime News : विवाहितेने अनैतिक संबंध तोडले, शेजाऱ्याने चिमुकल्याला बादलीत बुडवून मारलं

२४ वर्षीय आरोपीला पोलिसांनी केली अटक, स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा
Crime News : विवाहितेने अनैतिक संबंध तोडले, शेजाऱ्याने चिमुकल्याला बादलीत बुडवून मारलं

पालघरमधून बेपत्ता झालेल्या ५ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या चिमुकल्याच्या हत्येचं गुढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. चिमुकल्याच्या आईने अनैतिक संबंध तोडल्यामुळे तिच्या शेजारच्याने चिमुकल्याला बादलीतील पाण्यात बुडवून मारल्याचं समोर आलं आहे. पालघरमध्ये बोईसर येथे दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती.

पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या हत्येचा उलगडा करत २४ वर्षीय आरोपी महेंद्र सोमर सिंह याला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध बोईसर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुकल्याच्या शोधासाठी त्याच्या घरच्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्टर्स व्हायरल केली होती. परंतू त्याचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली होती.

२४ वर्षीय आरोपी महेंद्र सोमर सिंह आणि चिमुकल्याची आई एकमेकांच्या शेजारीच राहत होते. दरम्यानच्या काळात आरोपीचे विवाहितेशी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र अचानक महिलेने विवाहबाह्य संबंधांना सुरु ठेवण्यास नकार दिल्याने शेजाऱ्याने धडा शिकवण्याच्या उद्देशाने तिच्या मुलाचा जीव घेतला. पोलीस सध्या या प्रकरणाता अधिक तपास करत आहेत.

Crime News : विवाहितेने अनैतिक संबंध तोडले, शेजाऱ्याने चिमुकल्याला बादलीत बुडवून मारलं
मांजरीच्या धक्क्याने सांडलेलं विषारी औषध दीड वर्षाच्या चिमुकल्याच्या पोटात, बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in