पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नितीन शिंदे: आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेलल्या जागेसाठी लागलेल्या पोट निवडणुकीकरीता आज सकाळी सात वाजल्यापासून पंढरपुर मंगळवेढा आणि मंगळवेढ्यात मतदानाला सुरुवात झाली. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी सहकुटुंब पंढरपुर मध्ये मतदान केले तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा येथे सहकुटुंब मतदान केलं. यावेळी दोन्ही उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.सोलापूर जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढत आसल्याने मतदान करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह कमी दिसतोय.

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं यासाठी मतदान 12 तास सुरू राहणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात एकूण 3 लाख 2 हजार 914 मतदार आहेत. निवडणुकीसाठी मतदार संघात कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. संवेदनशील असणाऱ्या 16 मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी स्थानिक पोलीस, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भारत भालके सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले होते. तीन वेगवेगळ्या पक्षातून ते सभागृहात पोहोचले होते. 2009मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि ते राजकारणातील जायंट किलर ठरले. 2019 मध्ये त्यांनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला. विशेष म्हणजे 2019मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खरंतर त्यावेळी ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ऐनवेळी भारत भालकेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मतदारसंघात रिकामी झालेल्या जागेवर आता कोण निवडून येणार हे 2 मे च्या निकालानंतर कळेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT