कारचा अपघात झाल्याचा बनाव करत सोनं लुटलं, ४८ तासांत आरोपी जेरबंद

सांगोला तालुक्यातील घटना, पोलीस पथकाची धडाकेबाज कारवाई
कारचा अपघात झाल्याचा बनाव करत सोनं लुटलं, ४८ तासांत आरोपी जेरबंद

कारचा अपघात झाल्याचा बनाव करत दगडाने मारहाण करत सोनं लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ४८ तासांत जेरबंद केलं आहे. सांगोला तालुक्यातील एखतपूर-आचकदाणी रोडवर हा प्रकार घडला. सोलापूर ग्रामी गुन्हे शाखा आणि सांगोला पोलिसांनी याप्रकरणात तात्काळ कारवाईची चक्र वेगाने फिरवत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरुन येणाऱ्या दोघांना कारचा अपघात झाल्याचा बनाव करुन आरोपींनी थांबवलं. यानंतर दोघांनाही दगडाने मारहाण करत आरोपींनी त्यांच्याजवळ असलेलं सोन्याचं बिस्कीट लुटलं आणि घटनास्थळावरुन पोबारा केला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी दिपक जावडेकर, अनिल भोसले आणि प्रशांत पाटील यांना अटक केली आहे.

पोलिसांनी या गुन्ह्यातलं ४५ लाख ८१ हजार ५२२ रुपये किमतीचं ९२५ ग्रॅमचं सोन्याचं बिस्कीट ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

कारचा अपघात झाल्याचा बनाव करत सोनं लुटलं, ४८ तासांत आरोपी जेरबंद
पंढरपूर : पत्नी आणि मुलीचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला अटक

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in