Exclusive : 'मी चंदीगढमध्ये, लवकरच मुंबईत चौकशीसाठी हजर राहणार'; परमबीर सिंह यांचा ठिकाणा सापडला

Exclusive : 'मी चंदीगढमध्ये, लवकरच मुंबईत चौकशीसाठी हजर राहणार'; परमबीर सिंह यांचा ठिकाणा सापडला

इंडिया टुडेला दिली परमबीर सिंग यांनी माहिती

परमबीर सिंग हे कुठे आहेत? या प्रश्नाचं उत्तर आता परमबीर सिंग यांनीच दिलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीत परमबीर सिंग यांनी ही माहिती दिली आहे. तसंच आपण लवकरच जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीला सामोरे जाणार आहोत असंही त्यांनी सांगितलं. तसंच माझ्या विरोधात मुंबई, ठाण्यात ज्या पाच केसेस दाखल गेलेल्या केसेसनाही उत्तर देणार आहे.

परमबीर सिंग
परमबीर सिंगफाइल फोटो

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. या प्रकरणी त्यांनी एक पत्र मार्च महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. त्यानंतर हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणावर चर्चिलं गेलं. एप्रिल महिन्यात बॉम्बे हायकोर्टाने या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अनिल देशमुख यांना त्यांचं पद सोडावं लागलं. आता अनिल देशमुख तुरुंगात आहेत. मात्र परमबीर सिंग कुठे आहेत? याचं उत्तर कुणाकडेच नव्हता. आता त्याचं उत्तर परमबीर सिंग यांनी स्वतःच दिलं आहे. परमबीर सिंग यांनी इंडिया टुडेला सांगितलेल्या माहितीत आपण चंदीगढमध्ये असून लवकरच चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं म्हटलं आहे.

Exclusive : 'मी चंदीगढमध्ये, लवकरच मुंबईत चौकशीसाठी हजर राहणार'; परमबीर सिंह यांचा ठिकाणा सापडला
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित

वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक सदस्यीय चांदीवाल आयोग नियुक्त केला आहे. चांदीवाल आयोगाकडून अनेक वेळा सिंह यांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले, मात्र चौकशीकडे सिंह यांनी पाठ फिरवली आहे.

अखेर परमबीर सिंह यांच्यावतीने वरिष्ठ विधिज्ज्ञ अभिनव चंद्रचूड आणि आसिफ लंपवाला हे आयोगासमोर हजर झाले. पावर ऑफ अटर्नीसोबत (परमबीर सिंह यांचे प्रतिनिधीत्व करणारी व्यक्ती) देण्यात आलेलं प्रतिज्ञापत्र त्यांनी आयोगासमोर सादर केलं.

पावर ऑफ अॅटर्नी चंदीगढमध्ये तयार करण्यात आलेली असून, महेश पांचाळ नावाच्या व्यक्तीला आयोगासमोर परमबीर सिंह यांचा प्रतिनिधीत्व करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. परमबीर सिंह यांचा आयोगासमोर काही सांगण्याचा उद्देश नाही, असंही आयोगाला सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेलं आहे.

'परमबीर सिंह यांना जे काही सांगायचं होतं, ते त्यांनी मुख्यमंत्र्यांच्यासमोर मांडलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेतली आहे. परमबीर सिंह यांच्याकडे सांगण्यासारखं काहीही नाहीये. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात जे सांगितलं गेलं, ते खूप आहे', असंही या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे.

परमबीर सिंह हे परदेशात फरार झाले असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. पॉवर ऑफ अॅटर्नीचं ठिकाण चंदीगढ असल्यानं परमबीर सिंह चंदीगढमध्ये आहेत का? अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in