What’s App सुरू! ‘मेटा’कुटीला आलेल्या युजर्सचा जीव भांड्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

१२.३० ते २.३० असे दोन तास What’s App बंद होतं. त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या युजर्सचा जीव टांगणीला होता. आता अखेर हे अॅप सुरू झालं आहे त्यामुळे सगळ्या युजर्सचा जीव भांड्यात पडला आहे. काही मिनिटांपूर्वीच What’s App ची सेवा पूर्ववत झाली आहे. डिजिटल माध्यमातलं संवादाचं सर्वात मोठं माध्यम म्हणून या अॅपकडे पाहिलं जातं. अशात ते बंद झाल्याने नेटकरी हैराण झाले होते. जे आता सुरू झालं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

आज, दुपारी 12.30 वाजण्याच्या आसपास व्हॉटस अॅपवरून युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. इतर संकेतस्थळे सुरू असताना फक्त व्हॉट्स अॅपवरून मेसेज जात नसल्याने युजर्स गोंधळात पडले. त्यानंतर सोशल मीडियावर युजर्सकडून तक्रारींचा पाऊस पडू लागला. सुरुवातीला, व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये मेसेजचे जात नव्हते. त्यानंतर वैयक्तिक मेसेजिंगलाही अडचणी जाणवत होत्या. अखेर, ट्विटरवर व्हॉट्सअॅपची सेवा ठप्प झाल्याचे समोर आले. व्हॉट्सअॅपची मालकी असणाऱ्या ‘मेटा’ कंपनीकडूनदेखील तातडीने स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. मात्र, व्हॉट्सअॅप सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ‘मेटा’च्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

मागच्या वर्षीही ठप्प झालं होतं What’s App

मागच्या वर्षी देखील फेसबुकच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने WhatsApp ची सेवा ठप्प पडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा WhatsApp डाऊन झाले होते. ट्विटरवर युजर्सकडून याबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत होते. WhatsApp चा सर्व्हर क्रॅश झाल्याने सेवा खंडीत झाल्याचा दावा करण्यात येत होता. व्हॉट्सअॅप डाउन झाल्याने युजर्सकडून इतर मेसेजिंग अॅपचा वापर करण्यात येत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जगात सर्वाधिक वापरलं जाणारं What’s App हे अॅप डाऊन झालं होतं. मागच्या दोन तासापासून लोकांना मेसेज पाठवण्यात आणि येण्यात समस्या येत होत्या. तसंच अनेक ठिकाणी What’s App कनेक्टही होत नाहीये. त्याचाही फटका अनेकांना बसला. दिवाळीनिमित्त शुभेच्छा देणं असेल किंवा ऑफिसचं काम करणं असेल अनेकांसाठी What’s App हे अत्यंत उपयुक्त अॅप आहे. मात्र गेल्या २ तासांपासून ते डाऊन झालं होतं ट्विटरवर What’sAppDown हा ट्रेंड सुरू झाला आहे. आता अखेर हे अॅप सुरू झालं आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने ते डाऊन झालं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT