नाशिकजवळ पवन एक्सप्रेस रुळावरून घसरली; एका प्रवाशाचा मृत्यू, ६ जण जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एलटीटी म्हणजेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते जयानगर दरम्यान धावणाऱ्या पवन एक्स्प्रेसला अपघात झाल्याची घटना आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे मुंबईहून भुसावळच्या दिशेनं होणाऱ्या रेल्वेवर परिणाम झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनसकडून जयानगरच्या दिशेनं निघालेल्या पवन एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरून घसलले. मात्र, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती असून, सहा प्रवाशी जखमी झाले आहेत. नाशिकमधील देवळाली रेल्वे स्थानक ते लहवित रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या दुर्घटनेमुळे मुंबईहून भुसावळच्या दिशेनं होणाऱ्या रेल्वेवर परिणाम झाला आहे. सध्या मदत व बचाव कार्य सुरू आहे. रेल्वे विभागाने केलेल्या विनंतीवरून प्रवाशांना अडकलेल्या प्रवाशांना आणण्यासाठी एसटी महामंडळ आणि महानगरपालिका ट्रान्सपोर्टच्या बसेस पाठविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ॲम्बुलन्स आणि फायर ब्रिगेड च्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

ADVERTISEMENT

या अपघातामुळे गाडी क्र. १२१०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मनमाड, गाडी क्र. १२११० मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गाडी क्र. ११४०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आदिलाबाद या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर गाडी क्र. २२२२१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भुसावळ गाडी मार्गे वसई रोड जळगाव, गाडी क्र. १२२६१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भुसावळ मार्गे वसई रोड जळगाव आणि गाडी क्र. १२१७३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मनमाड या गाड्या दुसऱ्या मार्गांवरून वळवण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT