Social Media वर पेगासस फोन टॅपिंग कनेक्शनची चर्चा, मोदींच्या मंत्र्यांचे, खासदारांचे फोन टॅप?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रविवारी संध्याकाळी वॉशिंग्टन पोस्ट आणि लंडन गार्डियन या दोन वृत्तपत्रांमध्ये भारतातल्या पेगासस फोन टॅपिंगशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर येऊ शकते अशी चर्चा आहे. तसा अहवालच ही दोन वृत्तपत्रं प्रकाशित करण्याची चिन्हं आहेत. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी काय म्हटलं आहे?

‘अशा जोरदार अफवा आहेत की आज संध्याकाळी वॉशिंग्टन पोस्ट आणि लंडन गार्डियन एक अहवाल प्रकाशित करणार आहेत. या अहवालात मोदी सरकारमधले मंत्री, आरएसएसचे नेते, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप करण्यासाठी इस्रायली फर्म असलेल्या पेगासासची मदत घेण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रॉयन यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. फोन टॅपिंगच्या यादीत विरोधी पक्षाच्या नेत्यांचीही नावं आहेत. याचाच अर्थ विरोधी पक्षातल्या लोकांचेही फोन टॅप करण्यात आले आहेत.

ज्येष्ठ पत्रकार आणि गल्फ न्यूजमध्ये काम करणाऱ्या शील भट्ट यांनीही ट्वि करत म्हटंलं आहे की रविवारी प्रकाशित होणारी बातमी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडाभर वाद रंगवणारी आहेत. आता हे बघायचं की या फोन टॅपिंगमुळे कुणाला किती फरक पडेल आणि काय काय गोष्टी बाहेर येतील? या आशयाचं ट्विट शीला भट्ट यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

पत्रकार अरविंद गुणशेखर आणि रोहिणी सिंह यांनीही काही मेसेज पोस्ट केले आहेत. अरविंद गुणशेखर म्हणतात की यावेळी हे फोन टॅपिंग काय काय समोर आणतं हे बघायचं.. तर रोहिणी सिंह म्हणतात की ही वादळापूर्वीची शांतता आहे. पत्रकार खालिद शाह यांनी म्हटलं आहे की जे मी ऐकलं ते जर खरं असेल तर रविवारी मोठी बातमी समोर येणार आहे.

ADVERTISEMENT

काय आहे पेगासास फर्म?

इस्रायलचं सॉफ्टवेअर असलेलं पेगासास याचा वापर जगभरात गुप्त माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. भारतात काही काळापूर्वी पत्रकारांचे आणि समाजसेवकांचे फोन टॅप करण्यासाठी पेगासासचा वापर झाला अशी चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी या कंपनीने स्पष्टपणे सांगितलं होतं की आमच्या पेगासास सॉफ्टवेअरचा उपयोग हा फक्त सरकारी असतो.

आता अशी बातमी जर समोर आली तर काय काय घडणार आणि कुणा कुणाचा सहभाग या प्रकरणी आहे हे समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहेत. त्याचप्रमाणे या प्रकरणाचे पडसाद हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटू शकतात हे नक्की

    follow whatsapp

    ADVERTISEMENT