Phone Tapping प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार, दोषींवर कारवाई होणार-गृहमंत्री

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Phone Tapping प्रकरण अत्यंत गंभीर आहे त्या प्रकरणी चौकशी केली जाणार आहे आणि दोषींवर कारवाईही केली जाणार आहे असं आज महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सांगितलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांचा फोनही ते भाजपमध्ये असताना म्हणजेच 2016-2017 मध्ये टॅप झाला होता. फोन टॅपिंग प्रकरण हे गंभीर आहे त्या प्रकरणी सविस्तर चौकशी केली जाईल. कोणत्या लोकप्रतिनिधींचे फोन टॅप झाले होते आणि संमतीचा कसा गैरवापर झाला हे शोधलं जाणार आहे असंही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

नाना पटोले यांनी काय आरोप केला होता?

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 2016-17 या वर्षात माझे फोन टॅप करण्यात आला होते. त्या काळात इतरही लोकांचे फोन टॅप झाले होते. मात्र एका खासगी टीव्ही चॅनलकडू मिळाली असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला होता. त्यानंतर आजही यावर त्यांनी विधानसभेत याप्रकरणी नाना पटोले यांनी आजही भाष्य केलं. ज्या अधिकाऱ्यांनी फोन टॅप केले त्यांनी त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर मान्यता घेतली होती का? याबाबतचा खुलासा केला पाहिजे. कुणाच्या इशाऱ्याने हे फोन टॅपिंग केलं जातं? मुस्लिम नाव लिहिलं जाऊन माझा फोन टॅप का केला गेला याचीही माहिती मिळाली पाहिजे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. लोकप्रतिनिधी असूनही, खासदार असून अंमली पदार्थांशी संबंधित आम्हाला भासवण्यात आलं हे सगळं का केलं गेलं याचा खुलासा झाला पाहिजे अशीही मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगनंतर सुबोध जयस्वाल एक पत्र लिहिलं होतं.. काय आहे त्या पत्रात?

पोलिसांच्या बदलीसाठी काही राजकीय संबंध असलेले दलाल काम करत आहेत यासंदर्भातल्या तक्रारी आल्यानंतर आणि आरोप झाल्यानंतर मी हे संपूर्ण प्रकरण तपासलं. त्यासाठी काही फोनही टॅप केले. जाणीवपूर्वक काही फोन नंबर हे सर्व्हिलन्सवर होते. ज्यासाठीची मी रितसर परवानगी घेतली होती. या फोन टॅपिंग आणि इतर गोळा केलेल्या माहितीनंतर काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यासंदर्भातली माहिती आपण तातडीने मुख्यमंत्र्यांना द्यायला हवी असं मला वाटतं आहे. जे आरोप झाले ते धक्कादायक आहेत आणि समोर आलेलं वास्तवही जळजळीत सत्य आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांच्या बदल्याचं रॅकेट आणि त्यासाठी काम करणारे काही दलाल कार्यरत आहेत. या सगळ्यांचा जवळचा संबंध काही राजकारण्यांशी आहे. हे देखील समोर आलं आहे. बदल्यांसाठी काम करणाऱ्या ब्रोकर्सचं रॅकेट आहे ही गंभीर बाब समोर आली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षकापासून ते मोठ्या पदांपर्यंतच्या बदल्यांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

जो डेटा आणि माहिती समोर आली आहे त्यामध्ये असंही समोर आलं आहे की अशा प्रकारची परिस्थिती २०१७ मध्येही निर्माण झाली होती. त्या प्रकरणी या संदर्भात सखोल चौकशी करून ४०२, ४१९, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १७०, ५११, ३४ या आयपीसीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा सात जणांना अटकही करण्यात आली होती. या अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक असलेला नवाज हा पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.

हे संपूर्ण प्रकरण हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं गेलं पाहिजे. तसंच या प्रकरणातले जे दोषी आहेत त्यांच्या संबंधी योग्य ती कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. पोलीस दलातल्या नियुक्त्यांसाठी हे अशा प्रकारचं दलालांचं रॅकेट असणं योग्य नाही त्यामुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली जाते. आपण माझ्या या पत्रातील मुद्द्यांचा बारकाईने विचार करून या सर्व बाबी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवाव्यात. या आशयाचं पत्र रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांना लिहिलं होतं. मागच्या अधिवेशनाच्या नंतर या सगळ्या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला होता. आता महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं सांगितलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT