Crime: धक्कादायक... 12 वर्षीय मुलाचा 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

Pimpri-Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये एका 12 वर्षीय मुलाने 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
pimpri chinchwad crime shocking incident 12 year old boy sexually abused 4 year old girl
pimpri chinchwad crime shocking incident 12 year old boy sexually abused 4 year old girl(प्रातिनिधिक फोटो)

समीर शेख, पिंपरी-चिंचवड

पुण्याच्या नजीक पिंपरी-चिंचवडमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना प्रत्येक पालकांना चिंतेत टाकणारी अशीच आहे. मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी पिंपरी-चिंचवडमधील चिखली पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप 12 वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आलेलं नाही. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षीय मुलगा हा पीडित 4 वर्षीय चिमुकलीच्या शेजारीच राहतो. शेजारी असल्याने मुलाला पीडित मुलीच्या घरातील सर्व जण ओळखत होते. दरम्यान, मुलाच्या घरी कोणी नसताना 4 वर्षीय चिमुकलीला त्याने घरी आणलं. मुलाने चॉकलेट आणण्यास पैसे देतो असे आमिष दाखवून तिला आपल्या घरात आणलं आणि तिच्यावर अत्याचार केलं. असं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, अल्पवयीन मुलगा चिमुकलीवर अत्याचार करत असताना पीडित मुलीच्या आईने मुलाला रंगेहाथ पकडले असल्याची माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या गंभीर घटनेमुळे पालक चिंतेत पडले होते. अखेर पोलिसात तक्रार द्यायची असं पीडित मुलीच्या आईने ठरवले आणि त्यानुसार त्यांनी पोलिसात गुन्हा दाखल व्हावा यासाठी तक्रार दिली. मात्र, अद्याप तरी आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आलेलं नाही.

दुसरीकडे या संपूर्ण घटनेने अवघ्या पिंपरी-चिंचवडमध्ये एकच खळबळ माजली आहे. एका अल्पवयीन मुलाने अवघ्या 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना सगळ्यांनाच हादरवून टाकणारी आहे.

राज्यात एकीकडे दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच एका अल्पवयीन मुलाकडून अवघ्या 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याने पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांना देखील धक्का बसला आहे.

याप्रकरणी आरोपी मुलाला ताब्यात घेऊन सुधारगृहात पाठविण्याची कारवाई अपेक्षित आहे. मात्र, पोलीस नेमकं काय करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. पण अद्याप तरी काहीही कारवाई करण्यात आली नाही. हे संपूर्ण प्रकरण अत्यंत नाजूक असल्याने पोलीस ते त्याच पद्धतीने हाताळत आहेत.

pimpri chinchwad crime shocking incident 12 year old boy sexually abused 4 year old girl
रुग्णालयात जाणाऱ्या 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; तीन नराधमांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आईला जामिन मिळवून देण्याचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दुसरीकडे डोंबिवलीत ड्रग्ज प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीची आई सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मी तुझ्या आईला जामीन मिळवून देण्यात मदत करतो असं आमिष दाखवून आरोपीने या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रदीप बेहरा असं या आरोपीचं नाव असून मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी प्रदीप हा कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या एका ढाब्याच्या बाजूला असलेल्या इमारतीत राहतो. मानखुर्द भागात राहणारी ही महिला ड्रग्जप्रकरणी न्यायालयीन कोठडीत अर्थात जेलमध्ये होती. ही महिला जेलमधून बाहेर आल्यानंतर तिच्या १४ वर्षीय मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आईला सांगितली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in