Shirdi: साईंच्या पालखीत करायचा होता ‘सैराट’, गोळीबाराने हादरली साईनगरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shirdi Crime: शिर्डी: मुंबईहून( गोरेगाव) शिर्डीला (Shirdi) जात असलेल्या द्वारकमाई मंडळाच्या साईबाबांच्या (SaiBaba) पालखीमध्ये काल (31 डिसेंबर) दुपारी तीनच्या सुमारास गोळीबाराची (firing) भयंकर घटना घडली. अचानक झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण पालखीमध्ये एकच घबराट पसरली होती. मिळालेल्या माहितीनुसार पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे. (plan of sairat was in the palanquin of shirdi accused open firing on the road)

विकी भांगे (पुसद यवतमाळ) याने पूर्ववैमनस्यातून निलेश पवार याच्यावर पालखीत गोळीबार केला ज्यामध्ये निलेश पवार हा गंभीररित्या जखमी झाला आहे. विकी भांगेने गावठी कट्यातून निलेशवर दोन गोळ्या झाडल्या. सदर घटना ही शिर्डीपासून 5 किलोमीटर अंतरावर लक्ष्मीवाडी येथील हायवेवर पालखी थांबली असता घडली. यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं होतं.

Murder: जालन्यात सैराट… प्रतिष्ठेसाठी पोटच्या पोरीचा आवळला गळा, लगेच जाळूनही टाकलं!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जेव्हा गोळीबार झाला तेव्हा पालखीमध्ये एकच गोंधळ उडाला. ज्याचा फायदा घेऊन आरोपी विकी हा पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र, यावेळी काही पालखीतील साई भक्तांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्याला मोठ्या शिताफीनं पकडलं. त्यानंतर त्याला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

दरम्यान, या गोळीबारात निलेश पवारच्या उजव्या खांद्याला दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. ज्यानंतर त्याला शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल करण्यात आले असल्याची माहिती शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

गोळीबाराचं नेमकं कारण काय?

शिर्डीत येणाऱ्या अनेक साईबाबा पालखी या मागील दोन वर्ष कोरोना संक्रमणामुळे येऊ शकल्या नव्हत्या. मात्र, यंदा कोरोनाचं सावट नसल्याने अनेक पालख्या या शिर्डीच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे या संपूर्ण भागात नेहमीच भक्तीमय वातावरण असतं. असं असताना काल अचानक झालेल्या या गोळीबाराने सर्वांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. मात्र, आता या गोळीबाराचं नेमकं कारण समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

‘सैराट’… नराधम भावाने बहिणीची केली हत्या, ‘यासाठी’ घेतला जीव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी निलेश पवार याने साधारण दोन वर्षांपूर्वी आरोपी विकी भांगे याच्या बहिणीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. याच गोष्टीचा राग हा विकीच्या मनात कायम होता. आपल्या बहिणीसोबत पळून जाणाऱ्या निलेशचा कायमचा काटा काढावा यासाठी बरेच दिवस विकी प्रयत्न करत होता. अखेर काल त्याला तशी संधी शिर्डीत मिळाली.

विकी भांगे हा गेल्या अनेक दिवसांपासून निलेशवर पाळत ठेवून होता. पण जेव्हा त्याला हे समजलं की, निलेश साई पालखीसोबत शिर्डीला पायी जाणार आहे. तेव्हा हीच योग्य संधी असल्याचं ठरवून विकी भर पालखीमध्ये निलेशवर गोळीबार केला. पण सुदैवाने गोळ्या निलेशच्या खांद्याला लागल्याने त्याचा जीव बचावला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT