Nepal Plane Crash: नेपाळवर संक्रांत, 72 जणांसह विमान कोसळलं; 36 मृतदेह हाती

Nepal Plane Crash Update: नेपाळमधील एका प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला असून यात मोठी जीवितहानी झाली आहे. 72 जणांसह प्रवास करणाऱ्या हे विमान अचानक कोसळलं ज्यामध्ये आतापर्यंत 36 मृतदेह हाती आले आहेत.
नेपाळमध्ये मोठी जीवितहानी, 72 जणांसह विमान कोसळलं
नेपाळमध्ये मोठी जीवितहानी, 72 जणांसह विमान कोसळलं

Nepal Plane Crash Updates: काठमांडू: नेपाळावर (Nepal) मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशीच संक्रांतच ओढावली आहे. कारण नेपाळमध्ये एक मोठा विमान अपघात (Plane Crash) झाला असून यामध्ये आतापर्यंत तब्बल 36 प्रवाशांचे मृतदेह हाती (36 dead bodies recovered) लागले आहेत. नेपाळमधील पोखरा येथे प्रवासी विमान कोसळले असून त्यात एकूण 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर होते. नेपाळ आर्मी, सशस्त्र पोलीस, नेपाळ पोलीस तसेच स्थानिक नागरिक बचाव कार्यात गुंतले आहेत. बचाव मोहिमेदरम्यान आतापर्यंत 36 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दुर्घटनाग्रस्त प्रवासी विमान राजधानी काठमांडूहून (Kathmandu) पोखराला जात होते. (plane crashes in nepal with 72 passengers 36 dead bodies recovered)

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान पुष्प कमल यांनी सर्व सरकारी यंत्रणांना प्रभावी बचाव कार्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेबाबत त्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठकही बोलावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यति एअरलाइन्सच्या ATR-72 विमानाने काठमांडूहून पोखरा येथे उड्डाण केले होते.

नेपाळमध्ये मोठी जीवितहानी, 72 जणांसह विमान कोसळलं
नेपाळ दुर्घटना: ठाण्यातील जोडपं विखुरलेला संसार सावरायला गेले, अन्...

72 आसनी ATR-72 विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स म्हणजेच एकूण 72 लोक होते. विमान पोखराजवळ पोहोचले असताना अचानक डोंगराळ भागात हा अपघात झाला. नेपाळी मीडियानुसार, पोखराचे जुने देशांतर्गत विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हा अपघात झाला.

काठमांडू पोस्टनुसार, यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी सांगितले की, विमानात 68 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. आतापर्यंत 36 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हा अपघात आज (15 जानेवारी) 11.10 वाजता झाला. हे विमान पोखरा खोऱ्यातील सेती नदीच्या खोऱ्यात कोसळले.

नेपाळमध्ये मोठी जीवितहानी, 72 जणांसह विमान कोसळलं
चीनमध्ये मोठी दुर्घटना! १३३ प्रवाशांना घेऊन जाणार बोईंग 737 विमान कोसळलं

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच विमानतळ आणि विमान कंपन्यांसह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. नेपाळी लष्करासोबतच बचाव पथकही तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. अपघातानंतर बराच वेळ घटनास्थळावरून धुराचे लोट पाहायला मिळत होते. बचाव पथकाने आतापर्यंत 32 मृतदेह बाहेर काढले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in