Farm Laws Timeline : दीड वर्षांत आतापर्यंत काय-काय घडलं? जाणून घ्या...

पंतप्रधान मोदींकडून कृषी कायदे मागे घेतले जाणार असल्याची घोषणा
Farm Laws Timeline : दीड वर्षांत आतापर्यंत काय-काय घडलं? जाणून घ्या...
फोटो सौजन्य - Getty Images

गेल्या दीड वर्षापासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज एका अर्थाने पूर्णविराम लागला आहे. शेतकऱ्यांचा विरोध असणारे तीन कृषी कायदे केंद्र सरकारने आगामी अधिवेशनात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, पंतप्रधान मोदींनी आज सकाळी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात याबद्दलची घोषणा केली. गेल्या वर्षभरापासून दिल्लीत शेतकरी संघटना कृषी कायद्याविरुद्ध जोरदार आंदोलन करत होत्या. ज्यात अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले.

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला जगभरातूनही पाठींबा मिळालया लागला. आंतरराष्ट्रीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पॉप सिंगर रेहाना, अमेरिकेच्या व्हाईस प्रेसिंगड कमला हॅरिस यांची पुतणी आणि प्रसिद्ध वकील मीना हॅरीस यांनीही या आंदोलनाला आपला पाठींबा दर्शवला.

केंद्राने ज्या दिवशी तीन कृषी कायदे तयार करुन संसदेत पास करवुन घेतले त्या दिवसापासून आतापर्यंत काय काय घडलं हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

५ जून २०२० - केंद्र सरकारने ३ कृषी विधेयकांची प्रक्रिया सुरु केली

१४ सप्टेंबर २०२० - तिन्ही कृषी विधेयक संसदेत सादर करण्यात आली.

१७ सप्टेंबर २०२० - लोकसभेत तिन्ही विधेयक मंजूर

२० सप्टेंबर २०२० - तिन्ही विधेयक राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर

२४ सप्टेंबर २०२० - पंजाबमधील शेतकतऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात तीन दिवसांच्या रेल रोकोची घोषणा केली.

२५ सप्टेंबर २०२० - केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरुद्ध लढण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन All India Kisan Sangharsh Coordination Committee (AIKSCC) ची स्थापना केली.

२६ सप्टेंबर २०२० - भाजपला पहिला राजकीय धक्का, जुन्या सहकाऱ्यांपैकी एक असलेल्या शिरोमणी अकाली दलने कृषी विधेयकाविरुद्ध मत नोंदवून NDA मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

२७ सप्टेंबर २०२० - तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी आणि विधेयकाचं कायद्यात रुपांतर

२५ नोव्हेंबर २०२० - पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांनी दिल्ली चलो आंदोलनाची हाक दिली. परंतू दिल्ली पोलिसांनी कोरोनाचं कारण देऊन शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेशाची परवानगी दिली नाही.

२६ नोव्हेंबर २०२० - दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले. हरियाणातील अंबाला जिल्ह्यात पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा संघर्ष

२८ नोव्हेंबर २०२० - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी ज्या क्षणी दिल्लीची सीमा सोडून त्यांना नेमून दिलेल्या बुरारी येथील आंदोलनस्थळी जातील तिकडे त्याक्षणी चर्चा करायची तयारी दाखवली. परंतू शेतकरी संघटनांनी याला विरोध दर्शवला.

Farm Laws Timeline : दीड वर्षांत आतापर्यंत काय-काय घडलं? जाणून घ्या...
देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रह करून अहंकारी सरकारला झुकवलं-राहुल गांधी

३ डिसेंबर २०२० - केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची पहिली बैठक संपन्न, तोडगा काहीच नाही.

५ डिसेंबर २०२० - केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेची दुसरी फेरी, तरीही तोडगा नाहीच

८ डिसेंबर २०२० - शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली, इतर राज्यातील शेतकऱ्यांचाही बंदला पाठींबा

९ डिसेंबर २०२० - केंद्र सरकारने तीन कृषी कायद्यांमध्ये बदल करण्याची दिलेली ऑफरही शेतकरी संघटनांनी धुडकावली.

११ डिसेंबर २०२० - केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध भारतीय किसान मोर्चा संघटनेची सर्वोच्च न्यायालयात धाव

१३ डिसेंबर २०२० - तत्कालीन केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा शेतकरी आंदोलनात तुकडे-तुकडे गँगचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप.

३० डिसेंबर २०२० - केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमधली चर्चेची सहावी फेरी निष्फळ

४ जानेवारी २०२१ - केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमधली चर्चेती सातवी फेरी निष्फळ, कृषी कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारचा नकार

७ जानेवारी २०२१ - सर्वोच्च न्यायालयाने भारतीय किसान मोर्चाने दाखल केलेली याचिका दाखल करुन घेत ११ जानेवारीला सुनावणी ठेवली.

११ जानेवारी २०२१ - शेतकरी आंदोलन हाताळण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारवर ताशेरे

१२ जानेवारी २०२१ - सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्राच्या कृषी कायद्यांना स्थगिती, कायद्यात बदल करण्यासाठी कोर्टाकडून चार सदस्यीय समितीची स्थापना.

२६ जानेवारी २०२१ - प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत पोलिसांसोबत संघर्ष, संतप्त शेतकरी लाल किल्ल्यात शिरले. एकाचा मृत्यू.

२९ जानेवारी २०२१ - केंद्र सरकारने कृषी कायदे पुढील एक ते दीड वर्षांसाठी स्थगित करुन कायद्यात बदल करण्यासाठी तज्ज्ञ लोकांच्या संयुक्त समितीची स्थापना करण्याची ऑफर दिली. परंतू ही ऑफरही शेतकऱ्यांनी धुडकावली.

Farm Laws Timeline : दीड वर्षांत आतापर्यंत काय-काय घडलं? जाणून घ्या...
पंजाब आणि उत्तर प्रदेश निवडणुकीत फटका बसणार हे लक्षात आल्यानेच कृषी कायदे रद्द-शरद पवार

५ फेब्रुवारी २०२१ - पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्विटरवर शेअर केलेल्या शेतकरी आंदोलनाच्या टूल किट प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने FIR दाखल केली.

६ फेब्रुवारी २०२१ - आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी देशभरात दुपारी १२ ते ३ या वेळेत चक्काजाम आंदोलन केलं.

६ मार्च २०२१ - शेतकरी आंदोलनाचे १०० दिवस पूर्ण झाले

८ मार्च २०२१ - सिंघू बॉर्डरजवळ गोळीबार, परंतू कोणतीही जिवीतहानी नाही.

१५ एप्रिल २०२१ - हरयाणाचे उप-मुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून शेतकऱ्यांसोबत पुन्हा एकदा चर्चा करण्याची विनंती केली.

२७ मे २०२१ - कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी साजरा केला काळा दिवस, जागोजागी पुतळ्यांचं दहन

Farm Laws Timeline : दीड वर्षांत आतापर्यंत काय-काय घडलं? जाणून घ्या...
Farm Laws : मोदींनी आज 'त्या' भाजपा नेत्यांच्या अन् भक्तांच्या कानशिलात लगावली -संजय राऊत

५ जून २०२१ - कृषी कायद्याविरुद्ध लढाईची आठवण म्हणून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी साजरा केला संपूर्ण क्रांतिकारी दिव,

२६ जून २०२१ - शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच केलं.

२२ जुलै २०२१ - आंदोलनस्थळी २०० शेतकऱ्यांनी प्रति संसदेची स्थापना करुन पावसाळी अधिवेशनात आपली गाऱ्हाणी मांडली.

७ ऑगस्ट २०२१ - विरोधी पक्षातील १४ नेते कृषी कायद्यांविरुद्ध रणनिती ठरवण्यासाठी एकत्र जमले.

५ सप्टेंबर २०२१ - मुजफ्परनगरमध्ये शेतकरी संघटनांचं जोरदार शक्तीप्रदर्शन

Farm Laws Timeline : दीड वर्षांत आतापर्यंत काय-काय घडलं? जाणून घ्या...
आधी भूसंपादन, आता कृषी कायदा... पाहा मोदी सरकार आतापर्यंत किती वेळा शेतकऱ्यांसमोर झुकलं

२२ ऑक्टोबर २०२१ - सर्वोच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान प्रकरण न्यायालयासमोर प्रलंबित असलं तरीही आम्ही जनतेच्या आंदोलन करण्याच्या अधिकाराच्या आड येणार नाही असं सांगितलं. परंतू आंदोलनकर्ते अनिश्चीत काळासाठी रस्ते अडवून बसू शकणार नाही असंही कोर्टाने सुनावलं.

२९ ऑक्टोबर २०२१ - दिल्ली पोलिसांनी गाझीपूर सीमेवरुन बॅरिकेडींग हटवायला सुरुवात केली.

१९ नोव्हेंबर २०२१ - पंतप्रधान मोदींकडून तिन्ही कृषी कायदे आगामी अधिवेशनात मागे घेतले जाणार असल्याची घोषणा

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in