कोरोना झाल्याचं कळताच पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे प्रणेते शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबद्दलची माहिती देत, आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान शरद पवारांना कोरोनाची लागण झाल्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याची दखल घेत, फोन करुन त्यांची विचारपूस केली आहे. पंतप्रधानांनी आपल्या तब्येतीची चौकशी केल्याबद्दल मी आभारी असल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत.

देशातले अनुभवी नेते म्हणून शरद पवारांचं दिल्लीच्या राजकारणात मोठं वजन आहे. युपीए सरकारच्या काळात अनेक महत्वाची पदं भूषवलेल्या शरद पवारांनी अनेकदा मोदी सरकारलाही सल्ला दिला आहे. खुद्द नरेंद्र मोदींनीही शरद पवारांचं बोट धरुन मी राजकारण शिकल्याचं एका कार्यक्रमात बोलून दाखवलं होतं. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेन दानवे यांनीही शरद पवारांना कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शरद पवारांना कोरोनाची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे आगामी सात दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबद्दलची माहिती दिली.

कोरोना काळात शरद पवार यांनी राज्यात विविध ठिकाणीदौरे केले होते. गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शरद पवार हे सध्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी होम क्वारंटाईनमध्ये आहेत असंही कळतं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT