Tauktae: पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला 1500 कोटींची मदत जाहीर करतील-संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला तातडीने 1 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे त्याबद्दल आम्हाला वाईट वाटण्याचं कारणच नाही. कारण मोदींचं विमान भविष्यात महाराष्ट्राकडेही वळेल आणि ते महाराष्ट्राला 1500 कोटी तर गोव्याला 500 कोटींची मदत जाहीर करतील असा विश्वास मला वाटतो आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकासन झालेल्या जिल्ह्यांचा दौरा केला आहे ते आपला अहवाल केंद्राला पाठवतील.

शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रायगडचा दौरा करणार आहेत. तेदेखील त्यांचा अहवाल केंद्राला पाठवतील. त्यामुळे केंद्र सरकार आम्हाला मदत करणार याचा आम्हाला विश्वास आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सरकारकडूनही मागणी मोदींकडे केली जाईल. गुजरातला हजार कोटी दिले ते देऊदेत ते महाराष्ट्राला 1500 कोटी देतील असा विश्वास आपण ठेवला पाहिजे ते खूप दिलदार नेते आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकारच्या ‘करेक्ट कार्यक्रमा’चा मुहूर्त योग्य वेळी सांगणार- देवेंद्र फडणवीस

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Tauktae या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी कोकण दौरा करणार आहेत. तिथल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कोकण दौरा केला यानंतर त्यांनी रायगडमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर टीकाही केली. या सरकारने निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांनाच अद्याप मदत केलेली नाही. किमान आता या वादळात बाधित झालेल्यांना तरी मदत करा असं त्यांनी म्हटलं आहे.

Tauktae Cyclone : गोरेगावमध्ये कोविड सेंटरची वाताहत

ADVERTISEMENT

गुजरातला 1 हजार कोटींची मदत केली मात्र महाराष्ट्राला नाही यावर फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, गुजरातमध्ये नुकसान सर्वाधिक झालं आहे त्यामुळे त्या राज्याला मदत आधी जाहीर केली आहे. ज्या आठ राज्यांना या वादळाचा फटका बसला आहे त्या सगळ्या राज्यांना केंद्र सरकार मदत करणार आहे. कर्नाटक, गोवा, तामिळनाडू या राज्यांनी ही मदत दिल्यानंतर काहीही ओरड केली नाही मात्र महाराष्ट्रातल्या नेत्यांनी लगेच ओरड करायला सुरूवात केली. याचं महत्त्वाचं कारण हे आहे की या सरकारमधल्या मंत्र्यांचा अजेंडा ठरला आहे की रोज सकाळी उठायचं आणि केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं. चांगला निर्णय झाला तर राज्यामुळे झाला, चूक झाली तर केंद्र सरकार जबाबदार असा या सरकारचा कारभार सुरू आहे असाही टोला फडणवीस यांनी लगावला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT