कोथरूडमधली मुलं रविवारीही शाळेत जातात का? मोदींच्या पुणे दौऱ्यानंतर सुरू झालं ट्रोलिंग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी आज त्या ठिकाणी जाऊन पुणे मेट्रोचं उद्घाटन केलं. पुणे मेट्रोमधून त्यांनी काही शाळकरी विद्यार्थ्यांसोबत प्रवासही केला. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र याच फोटोंवरून भाजपला आणि पंतप्रधान मोदींना काँग्रेससह नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. रविवारी मुलं गणवेशात कशी काय? रविवारीही कोथरूड आणि पुण्यातली मुलं शाळेत जातात का? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

आंदोलनजीवी पुणेरी नजर या अकाऊंटवरून एक प्रश्न विचारण्यात आला आहे. आदरणीय चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार झाल्यापासून कोथरूडमधली मुलं रविवारीही शाळेत जातात की काय? हा काय प्रकार आहे? #ModiinPune #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_ जा हे दोन हॅशटॅगही त्यासोबत देण्यात आले आहेत.

Rofl Gandhi 2.0 या अकाऊंटवरून विचारणा करण्यात आली आहे की ‘अंकल आप भीडमे मास्क नहीं पहनते. नहीं. सिर्फ व्हीडिओ कॉलपर पहनता हूँ क्यूँ की कम्प्युटरमें व्हायरस आ जाता है.’ असं म्हणत मोदींच्या मास्क न घालण्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Ammar Akhtar हा ट्विटर युजर म्हणतो हा तर मोदींचा मास्टर स्ट्रोक आहे. WhatsApp University नावे एक ट्विटर अकाऊंट आहे त्यामध्ये या फोटोचं मीम तयार करण्यात आलं आहे. मेट्रोत उभा असणारा विद्यार्थी मोदींना विचारतो आहे की आपही है ना जो पहले चाय बेचते थे और अब देश. असं यात दाखवण्यात आलं आहे.

Swati Dixit नावाची ट्विटर युजरने ही एक मीम शेअर केलं आहे. यात मोदींच्या बाजूला बसलेली शाळकरी मुलगी म्हणते मोदीजी रविवार को स्कूल को छुट्टी होती आहे, फिर भी आपने हमे स्कूल युनिफॉर्ममें अपनी PR के लिए बुला लिया. त्यावर मोदीजी रिप्लाय देत आहेत, मुझे क्या पता मै कभी स्कूल नहीं गया. असं म्हणत या मीममधून खिल्ली उडवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

काँग्रेसने काय ट्विट केलं आहे?

ADVERTISEMENT

रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं)

तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात?

#महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा

आज रविवार होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्घघाटनासाठी पुण्यात आले होते. शाळकरी मुलांसोबत त्यांनी केलेल्या प्रवासावरून आता त्यांना ट्विटरवर ट्रोल केलं जातं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT