PM Narendra Modi यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, कोकणातील पूरस्थितीची घेतली माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीवेळापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि महाराष्ट्रातील पाऊस, कोकणातील पूरस्थिती यासंबंधीची माहिती घेतली. तसंच केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे. महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलं आहे. रायगड, सिंधुदुर्ग, चिपळुण आणि ज्या ठिकाणी पूरस्थिती आहे. या सगळ्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनीही घेतला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोन करून महाराष्ट्रातील सर्व पूरस्थितीची माहिती घेतली.

बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने कोकणातील जनजीवन कोलमडून गेलं. मुंबईनंतर पावसानं कोकणात धुमाकूळ घातला आहे. बुधवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये एका रात्रीत होत्याचं नव्हतं. वशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला वेढा दिला आहे. त्यानंतर हळूहळू चिपळूण शहरात पूर्णपणे पाणी भरलं. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने कहर केला. रायगड जिल्ह्यातील कर्जत व महाड हा परिसरही जलमय झाला असून, पुराने वेढा दिलेल्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक घेत प्रशासनाला तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेशही दिले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कणकवलीत संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कणकवली शहरातील हर्णे आळी येथे संतोष ठाणेकर यांच्या घरावर सकाळी झाड पडून मोठे नुकसान झाले आहे. कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांना याची माहीती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल होत पावसातच झाड बाजूला करण्याचें काम सुरू केले.

ADVERTISEMENT

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण घराचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस सुरु असल्याने काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे.

ADVERTISEMENT

सिंधुदुर्ग जिल्हाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आज सकाळी पासून सिंधुदुर्ग जिल्हात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. कुडाळ तालुक्यातील आबेंरी पुलावर पाणी आले असून हे पूल पाण्याखाली गेले आहे. यामुळे माणगाव खोरातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. तर सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे पुलावर पाणी आले आहे. शिरशींगे गावात जाणारी वाहतूक बंद झाली आहे. या गावाचा सावंतवाडीशी देखील संपर्क तुटला आहे.

याबाबत सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी यांनी माहिती दिली आहे. सद्यस्थितीत करूळ घाटाने भुईबावडा घाट मार्गाने होणारी वाहतूक बंद आहे. करूळ घाटात दरड कोसळली असून वाहतूक ठप्प झाली आहे. फोंडा घाट व आंबोली घाट मार्गाने कोल्हापूर येथे होणारी वाहतूक सुरू असून येथील भागातील वाहतूक वाढली आहे.

रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय बनले आहे. पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने अवघं चिपळूण शहर जलमय झाले असून 2005 पेक्षाही अधिक प्रमाणात पूर आला आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये सात फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT