Dombivali Gang Rape प्रकरणात वापरण्यात आलेली रिक्षा पोलिसांनी केली जप्त

जाणून घ्या काय म्हटलं आहे पोलिसांनी
Dombivali Gang Rape प्रकरणात  वापरण्यात आलेली रिक्षा पोलिसांनी केली जप्त
Dombivli Minor Gang Rape(प्रातिनिधिक फोटो)

Dombivali सामूहिक बलात्कार प्रकरणात वापरण्यात आलेली रिक्षा आता पोलिसांनी जप्त केली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी 29 जणांना अटक केली आहे. या सगळ्यांनी या प्रकरणातल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले आहेत.

तीन दिवसांनी या मुलीला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डोंबिवलीच्य मानपाडा पोलीस ठाण्याबाहेर या प्रकरणात वापरण्यात आलेली रिक्षा ठेवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार MH05 DZ 3073 या नंबरची ही रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या रिक्षेत बसवूनच पीडित मुलीला रबाळे, नवी मुंबईतील काही ठिकाणं आणि डोंबिवलीतील काही ठिकाणांवर नेण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्यावर या ठिकाणी नेऊन बलात्कार करण्यात आला आणि तिला पुन्हा घरी सोडण्यासाठी याच रिक्षेचा वापर करण्यात आला.

या प्रकरणी अॅडव्होकेट तृप्ती पाटील यांनी सांगितलं की आत्तापर्यंत 29 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 19 जणांसाठी मी लढणार आहे असं त्यांनी सांगितलं. आरोप सिद्ध होईपरर्यंत हे सगळे निर्दोष आहेत असं मी मानते. ते निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी मी त्यांना साथ देणार आहे असं तृप्ती पाटील यांनी सांगितलं तसंच पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे असंही त्या म्हणाल्या.

या घटनेची वानवडी पोलिसांनी माहिती दिली.
या घटनेची वानवडी पोलिसांनी माहिती दिली.Aajtak

या घटनेबाबत तपास अधिकारी एसीपी सोनाली ढोले यांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी शुक्रवारी आणखी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यातले दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना ज्युवेनाईल कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. पीडित मुलीची प्रकृती स्थिर आहे. तिने जो जबाब दिला आहे त्याआधारे पोलिसांचा तपास सुरू आहे. तिच्यावर 33 जणांनी बलात्कार केल्याचं तिचं म्हणणं आहे.

यासंदर्भात तपास सुरू आहे. आत्ता ही माहिती समोर आली आहे की पीडित आणि मुख्य आरोपी यांची ओळख सोशल मीडियावर झाली होती. इतर काही आरोपींनाही पीडिता ओळखते. तिच्यासोबत झालेलं दुष्कृत्य डोंबिवली आणि नवी मुंबईच्या काही भागांमध्ये झालं आहे. पीडित मुलगी आणि मुख्य आरोपी यांची ओळख इंस्टाग्रामवरून झाली आहे. आत्तापर्यंत ज्या आरोपींना अटक करण्यात आली त्यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही असंही स्पष्ट झालं आहे.

अल्पवयीन मुलीने काय म्हटलं आहे?

29 जणांनी बलात्कार केला. सर्वात आधी डिसेंबरमध्ये या लोकांच्या संपर्कात ही मुलगी आली. पोलिसांनी जे म्हटलं आहे त्यानुसार मुलीची आणि तिच्या प्रियकराची भेट सोशल मीडियावरून झाली. मात्र मुलीने जे सांगितलं आहे त्यानुसार एक व्यक्ती तिच्या घरी येत होती त्या व्यक्तीच्या मार्फत ही मुलगी इतरांच्या संपर्कात आली. यातला जो मुख्य आरोपी आहे विजय फुके त्यालाही अटक करण्यात आली आहे.

त्यानंतर इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिला आधी भेटायला बोलावलं जात असे. त्यानंतर एखाद्या रूमवर नेऊन किंवा कुणाच्या तरी घरी नेऊन तिला शारिरीक संबंधांसाठी भाग पाडलं जात असे. तिने सुरूवातीला या सगळ्याला नकार दिला. मात्र तिचे व्हीडिओ काढण्यात आले ते व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी तिला देण्यात आली होती. त्यानंतर तिच्यावर फेब्रुवारी ते सप्टेंबर या कालावधीत विविध ठिकाणी बलात्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.