'महाराष्ट्र केसरी' विजेत्या मल्लाच्या बक्षीसावरुन साताऱ्यात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कुस्ती

वरातीमागून घोडे! विजेता मल्ल पृथ्वीराजवर आता बक्षीसांचा वर्षाव; नाराजीनाट्यानंतर साताऱ्यारात चढाओढीचं राजकारण
'महाराष्ट्र केसरी' विजेत्या मल्लाच्या बक्षीसावरुन साताऱ्यात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कुस्ती
आमदार शिवेंद्रराजे भोसले, महाराष्ट्र भाजपकडून पृथ्वीराज पाटीलला प्रत्येकी ५ लाखांचं बक्षीस

महाराष्ट्र केसरी विजेता मल्ल पृथ्वीराज पाटील याला विजेतेपद मिळवल्यानंतरही आयोजकांकडून रोख रकमेचं बक्षीस न मिळाल्यामुळे दिवसभर चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे स्वतः पृथ्वीराज पाटीलने व्हिडीओ तयार करत रोख रकमेचं बक्षीस न मिळाल्यामुळे खंत व्यक्त केली. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर साताऱ्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यात चढाओढीचं राजकारण पहायला मिळतं आहे.

स्पर्धेच्या संयोजकांकडून पृथ्वीराज पाटील यांना रोख रकमेचं बक्षीस न मिळाल्यामुळे जावळीचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पुढाकार घेत पृथ्वीराज पाटील याला ५ लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. याचसोबत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्र भाजपकडून पृथ्वीराजला ५ लाखांचं बक्षीस जाहीर केलं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजक दीपक आणि सुधीर पवार हे शिवेंद्रराजेंचे कट्टर विरोधक मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या पवार बंधुंवर बक्षिसाच्या रकमेवरुन टीका होत असताना संधी साधत शिवेंद्रराजेंनी ५ लाखांचं बक्षीस जाहीर करत कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

हे साताऱ्याच्या संस्कृतीला शोभणारं नाही - शिवेंद्रराजे भोसले महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्यात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सर्वांना सामावून घ्यायला पाहिजे होतं, परंतू तसं झालं नाही. याउलट महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लाने स्पर्धा जिंकल्यानंतर रोख रकमेचं बक्षीस न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त करणारा व्हिडीओ केला. विजेत्या मल्लाने अशी नाराजी व्यक्त करणं हे साताऱ्याच्या संस्कृतीला शोभणारं नाही. एक सातारकर म्हणून मला याविषयाची खंत वाटली. संयोजकांनी प्रायोजकांच्या माध्यमातून घेतलेले पैसे गेले कुठे असा सवाल आता मल्ल विचारत आहेत. त्यामुळे या नाराजीची दखल मी स्वतः घेत पृथ्वीराजला ५ लाखांचं बक्षीस जाहीर करतो आहे, असं शिवेंद्र राजे म्हणाले.

दरम्यान सातारा तालीम संघातर्फे स्पर्धेचं यजमानपद आणि आयोजनाची जबाबदारी स्विकारणाऱ्या दीपक पवार यांनी रोख रकमेचं बक्षीस देण्याचं ठरलेलंच नव्हतं असं सांगितलं. स्पर्धेचं यजमानपद घेताना आम्ही कुस्तीगीर परिषदेला २१ लाखांचा चेक दिला होता. या पैश्यांमधून स्पर्धेतील मल्लांचे प्रशिक्षक आणि इतर खर्च करणं अपेक्षित होता. आम्ही या स्पर्धेसाठी कोट्यवधी खर्च केले आहेत, त्यामुळे पृथ्वीराजला ५१ हजारांचं बक्षीस देण्यास आम्हाला काहीच अडचण नाही. परंतू बक्षीसाची रक्कम देणं हे ठरलेलं नव्हतं असं म्हणत पवार यांनी ही जबाबदारी कुस्तीगीर परिषदेवर ढकलण्याचा प्रयत्न केला.

आमदार शिवेंद्रराजे भोसले, महाराष्ट्र भाजपकडून पृथ्वीराज पाटीलला प्रत्येकी ५ लाखांचं बक्षीस
'महाराष्ट्र केसरी'त रंगली दोस्तांमध्ये कुस्ती! सिकंदर शेखने माऊली जमदाडेला दाखवलं अस्मान

एकीकडे भाजपने पृथ्वीराज पाटीलला बक्षीस जाहीर करुन राष्ट्रवादीवर कुरघोडी केल्यानंतर शिवसेनेलाही जाग आली आहे. स्पर्धेच्या आयोजन समिती सदस्यांपैकी एक आणि मुख्य उद्घाटक शंभुराज देसाई यांनी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला शिवाजीराव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दोन लाखांचा धनादेश त्याच्या मुळ गावी रवाना केला आहे.

स्पर्धेच्या आयोजनासाठी यंदा आयोजकांनी कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन थाटामाटात स्पर्धा पार पाडली. परंतू विजेत्या मल्लाला रोख रकमेचं बक्षीस न मिळाल्यामुळे अखेरीस या स्पर्धेच्या आयोजनाला गालबोट लागलं आहे.

आमदार शिवेंद्रराजे भोसले, महाराष्ट्र भाजपकडून पृथ्वीराज पाटीलला प्रत्येकी ५ लाखांचं बक्षीस
महाराष्ट्र केसरी: २२ वर्षांचा दुष्काळ संपवत कोल्हापूरचा पठ्ठ्या पाहतोय ऑलिम्पिकचं स्वप्न

Related Stories

No stories found.