'RSS कोणत्याही थराला जाऊ शकते'; प्रकाश आंबेडकरांचं संघावर टीकास्त्र

पांचजन्यमधील इन्फोसिसबद्दल लिखाण ; आरएसएस माकडीणीप्रमाणे वागत असल्याची टीका
संघाच्या या भूमिकेवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीकास्त्र डागलं आहे.
संघाच्या या भूमिकेवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीकास्त्र डागलं आहे.Twitter

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या पांचजन्यमधून प्रसिद्ध इन्फोसिस कंपनी देशविरोधी असल्याचं लिखाण करण्यात आलं. यावरून बराच वाद निर्माण झाला. मात्र, स्वयंसेवक संघाने स्वतःला बाजूला केलं आहे. संघाच्या या भूमिकेवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीकास्त्र डागलं आहे.

पांचजन्यमधून भारतातील सॉफ्टवेअर निर्माती कंपनी इन्फोसिसवर टीका करण्यात आली होती. यावरून आरएसएसवर लक्ष्य करण्यात आलं. मात्र, आरएसएसने पांचजन्यशी आपला संबंध नसल्याचं म्हटलं आहे. या वादावरुन प्रकाश आंबेडकरांनी आरएसएसवर ट्वीट करून निशाणा साधला आहे.

'आरएसएस कोणत्याही थराला जाऊ शकते. पांचजन्य आपलं मुखपत्र असल्याचं ते स्वतः सांगतात. याच पांचजन्यमधून इन्फोसिस कंपनीला देशविरोधी म्हटलं गेलं. पण विरोध होताच आता आरएसएसने आता आपल्या मुलानाही नाकारलं आहे. माकडाप्रमाणे बुडायला लागले, तर मुलाच्या डोक्यावर पाय ठेवून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे', अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

पांचजन्य-इन्फोसिस प्रकरण काय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसशी सलग्नित असलेल्या पांचजन्य मासिकातून आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी इन्फोसिसवर टीका करण्यात आली होती. इन्फोसिसने जाणीवपूर्वक भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता.

'नक्षली, डाव्या पक्ष व तुकडे-तुकडे गँगला कंपनी मदत करत असल्याचाही आरोप करण्यात आला होता. मासिकाने प्रकाशित केलेल्या कव्हर स्टोरीमध्ये हा आरोप करण्यात आला होता. यावरून आरएसएसवर टीका सुरू झाली होती.

संघाची भूमिका काय?

पांचजन्यतील लेखावरून वाद चिघळल्याने आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रभारी सुनील आंबेकर यांनी ट्वीट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 'भारतीय कंपनी म्हणून इन्फोसिसचा भारताच्या विकासात महत्त्वाचा वाटा आहे. इन्फोसिसने तयार केलेल्या पोर्टलसंबंधी काही मुद्दे असू शकतात, पण पांचजन्यमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या लेखातील मतं ही लेखकाची व्यक्तिगत मतं आहेत. त्याचबरोबर पांचजन्य संघाचं मुखपत्र नाही', असं त्यांनी म्हटलेलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in