'शरद पवारांनाही आठवण करून द्यावी लागली, यातूनच सत्ताधारी पक्षाचा फडणवीसांबाबतचा पोटशूळ दिसतो'

'शरद पवारांनाही आठवण करून द्यावी लागली, यातूनच सत्ताधारी पक्षाचा फडणवीसांबाबतचा पोटशूळ दिसतो'

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचं शरद पवारांना उत्तर

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सत्ताधारी पक्षांमध्ये किती पोटशूळ आहे हे रोज आपण पाहतो आहेत. त्यांनी नवी मुंबईतल्या भाषणात एक वक्तव्य केलं की मी मुख्यमंत्रीपदावर नाही तरीही तोच जनाधार माझ्या पाठिशी कायम आहे. एका चांगल्या भावनेतून आलेल्या वक्तव्यावरही टीका करण्यात आली. ती भूमिकाही सहन होत नाही हे दिसलं असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

आधी नवाब मलिक बोलले आणि शरद पवारांनाही चार वेळा मुख्यमंत्री असल्याची आठवण करून द्यावी लागते यावरूनच देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत राष्ट्रवादी कोणत्या पातळीला गेली आहे हेच दिसतं असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

काय म्हणाले शरद पवार?

'देवेंद्र फडणवीस यांचं भाषण मी ऐकलं. ते म्हणाले मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही. पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट होतं. मी चारवेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, पण माझ्या कधी लक्षात राहिलं नाही. पाच वर्षे सत्तेत राहूनही आपण सत्तेत आहोत असं फडणवीसांना वाटतं ही चांगली आणि जमेची गोष्ट आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. ही कमतरता आमच्यामध्ये आहे. मी चारवेळा मुख्यमंत्री झालो पण माझ्या लक्षातही नाही. ' असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली होती.

एवढंच नाही तर शरद पवार पुढे म्हणाले की, 'मी असं कधी म्हटलं नव्हतं मी पुन्हा येईन, मी येणार. मी पुन्हा येईन अशी भाषा मी केली नव्हती. पण देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हापासून आत्तापर्यंत सत्ता गेल्याची वेदना किती खोलवर आहे हेच दाखवून दिलं आहे. सत्ता येते, जाते त्याचा फारसा विचार करायचा नसतो. सत्ता असताना समंजसपणाने सत्तेचा वापर हा लोकांच्या आणि राज्याच्या भल्यासाठी करायचा असतो.' असंही शरद पवार म्हणाले.

शरद पवार
शरद पवार

ED, NCB, CBI यांचा राजकीय वापर होतो आहे असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने या तपासयंत्रणांचं अभिनंदन करायला हवं होतं. सचिन वाझेचे धागेदोरे शोधल्याने अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. त्यातून या सगळ्या टीका होत आहेत असंही प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. केंद्रीय तपासयंत्रणांवर टीका करणं उचित आहे असं वाटत नाही असंही दरेकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राला ड्रग्जचा विळखा पडतो आहे याबाबत शरद पवारांनी चिंता व्यक्त करायला हवी होती. मात्र ज्येष्ठ नेत्यांनी या यंत्रणांची पाठ थोपटण्याऐवजी त्यांच्यावर टीका करण्याचं काम करत आहेत. शरद पवार यांच्या अशा वक्तव्यांमुळे यंत्रणांना बळ मिळण्याऐवजी ड्रग्ज तस्करांना बळ मिळतंय असंच दिसतं आहे.

'शरद पवारांनाही आठवण करून द्यावी लागली, यातूनच सत्ताधारी पक्षाचा फडणवीसांबाबतचा पोटशूळ दिसतो'
‘मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं’, देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पत्रकार परिषद मुंबईत झाली. अनेक गोष्टींचा उहापोह या पत्रकार परिषदेत झाला. ते पाहून मला अनेक प्रश्न पडले असंही विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. मावळचं खापर पोलिसांवर फोडलं जातं आहे, त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी केलेली कारवाई, अत्याचार हे विसरून जायचं. मला आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की शरद पवार म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला ही बाब त्या घटनेच्या मूल्यमापनाशी संबंधित आहे का? ते भाजपचे उपनगराध्यक्ष होते याचा शरद पवार यांना विसर पडला. लोकसभेच्या वेळी पार्थ पवार 41 हजार मतांनी मागे होते याचाही शरद पवारांना विसर पडला असंही दरेकर म्हणाले.

Related Stories

No stories found.