17 वर्षाच्या मुलीवर 3 वेळा बलात्कार; ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यूंची तुरुंगवारी टळली, देणार 122 कोटी

वर्जिनिया ग्रिफे बलात्कार प्रकरण : प्रिन्स अँड्र्यू आणि वर्जिनिया रॉबर्टस ग्रिफे यांच्यातील वादावर निघाला तोडगा : महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांनी केला हस्तक्षेप
17 वर्षाच्या मुलीवर 3 वेळा बलात्कार; ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यूंची तुरुंगवारी टळली, देणार 122 कोटी

लैंगिक शोषण केल्याच्या आरोप प्रकरणात ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू यांना तुरूंगवारी करावी लागणार नाही. बलात्कार प्रकरणात तोडगा निघाला असून, पूर्वाश्रमीची मॉडेल वर्जिनिया ग्रिफे यांनी मंगळवारी प्रकरण मिटवण्यास संमती दिली. मात्र, प्रकरणी प्रिन्स अँड्र्यू यांना वर्जिनिया ग्रिफे यांना १२२ कोटी रुपये भरपाई द्यावी लागणार आहे. मंगळवारी मॅनहॅटन येथील न्यायालयासमोर समेटाची कागदपत्रं सादर करण्यात आली.

'ड्यूक ऑफ यॉर्क' ब्रिटनचे राजकूमार प्रिन्स अँड्र्यू आणि वर्जियनिया रॉबर्टस ग्रिफे यांच्यात अखेर समेट झाला आहे. प्रिन्स अँड्र्यू हे ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांचे दुसरे सुपूत्र आहेत. महाराणीने या प्रकरणात हस्तक्षेप करत प्रिन्सला आर्थिक मदत केली होती. त्यानंतर आता वर्जिनिया ग्रिफे आणि प्रिन्स अँड्र्यू यांच्यातील बलात्कार प्रकरणात समेट झाला आहे.

ब्रिटनमधील माध्यमांनी याबद्दलचं वृत्त दिलं आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार बलात्कार प्रकरणात १२२ कोटी रुपयांचा देऊन समेट घडवण्यात आला आहे. 'डेली मेल'ने याबद्दलच वृत्त देताना म्हटलं आहे की, या प्रकरणात महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांनी हस्तक्षेप केला आहे. समेट घडवण्यासाठी ठरलेली रक्कम देण्यासाठी महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या या प्रिन्स अँड्र्यू यांना मदत करणार आहेत. भरपाईची सर्व रक्कम महाराणीच देणार आहे. टेलिग्राफनं दिलेल्या वृत्तातही हेच म्हटलेलं आहे.

प्रिन्स अँड्र्यू आणि वर्जिनिया ग्रिफे प्रकरण काय?

डेली मेलच्या वृत्तानुसार प्रिन्स अँड्र्यू आणि जेफ्री एपस्टेन यांची ओळखत होती. जेफ्रीने एपस्टेनचं वर्जिनिया ग्रेफी यांना प्रिन्स अँड्र्यू यांच्याकडे घेऊन गेली होती. प्रिन्स अँड्र्यू यांनी तीन वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते, असा आरोप वर्जिनिया ग्रेफी यांनी केला होता.

प्रिन्स अँड्र्यू यांच्यासोबत वर्जिनिया. हाच फोटो न्यायालयासमोर सादर करण्यात आला होता.
प्रिन्स अँड्र्यू यांच्यासोबत वर्जिनिया. हाच फोटो न्यायालयासमोर सादर करण्यात आला होता.

ही घटना मॅक्सवेल यांच्या लंडनस्थित असलेल्या टाऊन हाऊसमध्ये १० मार्च रोजी घडलं होतं. त्यावेळी प्रिन्स अँड्र्यू आणि वर्जिनिया पहिल्यादांच भेटले होते.

या प्रकरणातील एपस्टेन यांना लहान मुलांच्या तस्करी प्रकरणात २००८ मध्ये १८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, २०१० मध्ये त्यांना सोडण्यात आलं. एपस्टेनवर अनेक मुलीची तस्करी केल्याचे आरोप आहेत. वर्जिनिया ग्रिफे रॉबर्टसही या मुलींपैकीच एक आहे.

वर्जिनिया ग्रेफी
वर्जिनिया ग्रेफी

२०१५ मध्ये एपस्टेनशी संबंधित कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आले होते. या रिपोर्टसमध्येच वर्जिनिया ग्रिफे रॉबर्टस यांचंही नाव समाविष्ट होतं. फ्लोरिडातील दाखल केलेल्या एका प्रकरणात त्यांनी आपल्यावर १७ वर्षांची असताना प्रिन्स अँड्र्यू यांनी तीन वेळा जबरदस्ती लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in