CM Thackeray: 'जे जमणार असेल तेच वचन द्यायचं, हीच शिवसेनेची परंपरा', मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावलं?
promise only what you can do this is the tradition of shiv sena said cm thackeray indirectly attacked on bjp(फाइल फोटो, सौजन्य: CMO Maharashtra)

CM Thackeray: 'जे जमणार असेल तेच वचन द्यायचं, हीच शिवसेनेची परंपरा', मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावलं?

CM Thackeray attacked on BJP: आपल्या संबोधनात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. पाहा नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री.

मुंबई: 'दिलेलं वचन पाळलं नाही म्हणून मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करत आहे.' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 2019 साली एक अत्यंत ऐतिहासिक आणि आपल्या राजकीय कारकीर्दीला कलाटणी देणारा निर्णय घेतला होता. तेव्हापासून 'वचन' नेमकं कुणी पाळलं नाही याची सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा होत असते. असं असताना आज (1 जानेवारी) अनेक दिवसांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा 'वचना'वरुन आपल्या विरोधकांवर निशाणा साधला आहे.

'जे जमणार असेल तेच वचन द्यायचं.. जे जमणार नसेल ते वचन द्यायचं नाही... ही शिवसेनेची परंपरा आहे.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपण राजकारणात सक्रीय झालो असल्याचं दाखवून दिलं आहे. खरं म्हणजे त्यांच्या या वाक्याचा रोख हा भाजपकडेच होता. मात्र, यावेळी त्यांनी कोणाचंही नाव घेता अप्रत्यक्षरित्या भाजप नेतृत्वावर निशाणा साधला आहे.

'जे जमणार नसेल ते वचन द्यायचं नाही'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना 'गुड न्यूज' देण्यासाठी फेसबुक लाईव्हवरुन जनतेशी संवाद साधला. मुंबईतील 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांना यापुढे मालमत्ता कर माफ करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री केली. मात्र, याच वेळी त्यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला. पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले:

'शिवसेना आणि आता तर सोबत नवीन मित्र आलेले आहेत. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. आता आपण तिघे मिळून पुढे जात आहोत. इतर पक्ष.. आता आपण तिघे एकत्र आल्यानंतर इतर पक्ष कोण राहिले असेल ते तुम्हाला कळलं असेल. असंच चाललेलं आहे.'

'आम्ही या गोष्टी करु, आम्ही त्या गोष्टी करु.. नंतर कालांतराने तेही विसरतात आणि लोकंही विसरतात. पण शिवसेनेची जी परंपरा शिवसेनाप्रमुखांनी आखून दिली आहे. एक म्हणजे खोटं बोलायचं नाही. जे जमणार असेल तेच वचन द्यायचं.. जे जमणार नसेल निवडणूक जिंकण्यासाठी सुद्धा उपयोगी पडणारं असलं तरीही खोटं वचन द्यायचं नाही. ही आपली परंपरा आहे.'

'त्याच परंपरेत माझ्यासोबत बसलेले आहेत एकनाथाजी आहेत, यशवंत आहेत, किशोरीताई आहेत. सगळे शिवसैनिक हे त्यातून मोठे झाले आहेत. तीच परंपरा आपण पुढे नेत आहोत. आज मला आनंद एका गोष्टीचा होतो आहे की, 2017 रोजी आपण अनेक आश्वासनं किंवा वचनं.. आपण वचन देतो आणि वचन पाळतो.'

'कारण शेवटी निवडून कशासाठी द्यायचं, मतं आम्ही तुम्हाला का द्यायची. तुम्ही असं आमच्यासाठी काय करणार आहात. हे तर लोकांना सांगायलाच पाहिजे. ते जर सांगितलं नाही तर लोकं मत देणार नाहीत.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

promise only what you can do this is the tradition of shiv sena said cm thackeray indirectly attacked on bjp
ऑपरेशननंतर पहिल्यांदाच जनतेसमोर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण जसंच्या तसं..

विरोधक काय उत्तर देणार?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे. अशावेळी विरोधक या घोषणेबाबत नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी वचनावरुन जी अप्रत्यक्ष टीका केली आहे त्यावर देखील विरोधक काय उत्तर देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in