ED ची मोठी कारवाई, अभिनेता Dino Morea आणि Ahmed Patel यांच्या जावयाची कोट्यवधीची मालमत्ता जप्त

ED seized assets of Dino Morea: मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने अभिनेता दिनो मोरिया यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
ED ची मोठी कारवाई, अभिनेता Dino Morea आणि  Ahmed Patel यांच्या जावयाची कोट्यवधीची मालमत्ता जप्त
Dino Morea(फोटो सौजन्य: Facebook/Dino Morea)

नवी दिल्ली: मनी लाँड्रिंगप्रकरणी (Money laundering) बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया (Dino Morea) आणि कॉंग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल (ahmed patel) यांचे जावई यांची कोट्यवधीची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) जप्त केली आहे.

कॉंग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई इरफान सिद्दीकी, अभिनेता संजय खान, अभिनेता दिनो मोरिया आणि डीजे अकिल यांची गुजरातमधील फार्मास्युटिकल कंपनी स्टर्लिंग बायोटेक ग्रुपशी संबंधित पैशाच्या घोटाळ्याप्रकरणी मालमत्ता जप्त केल्याचे ईडी शुक्रवारी सांगितले. (Sterling-Biotech fraud case)

ईडीने म्हटले आहे की, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत चार जणांच्या मालमत्ता जप्त करण्याचे प्राथमिक आदेश जारी करण्यात आले आहेत. एकूम मालमत्तेचे मूल्य 8.79 कोटी रुपये इतके आहे.

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेपैकी संजय खानची 3 कोटींची मालमत्ता, दिनो मोरियाची 1.4 कोटी रुपये, डीजे अकील म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकील यांची 1.98 कोटी रुपये आणि अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दीकी याची 2.41 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिनो मोरिया आणि डीजे अकील यांना 2011 आणि 2012 दरम्यान पैसे देण्यात आले होते. हे दोघेही संदेसरा भावांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. जो दिल्लीत आयोजित करण्यात आला होता.

दिनो मोरिया आणि डीजे अकील यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काही लाख रुपये देण्यात आले होते. ईडीचं असं म्हणणं आहे की, की कंपनीने बँकेच्या फसवणूकीने मिळविलेल्या पैशांमधून हे पैसे दिनो मोरिया यांना दिले होते आणि त्यामुळे ही 'गुन्ह्यातील रक्कम' असल्याचं ईडीचं म्हणणं आहे. संदेसरा हे गुजरातमधील फार्मास्युटिकल कंपनीचे संचालक आणि मालक आहेत.

ईडीने एका निवेदनात असं म्हटलं आहे की, स्टर्लिंग बायोटेक समूहाचे फरारी संचालक नितीन संदेसरा आणि चेतन संदेसरा यांनी या गुन्ह्यातून मिळवलेली रक्कम या चार जणांना दिली. दरम्यान, यावेळी असंही म्हटलं आहे की, नितिन संदेसरा, चेतन संदेसरा, चेतनची पत्नी दीप्ती संदेसरा आणि हितेश पटेल यांना विशेष कोर्टाने फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे.

Dino Morea
अभिनेत्री यामी गौतमला ED चं समन्स, ७ जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

मनी लॉन्ड्रिंगचं हे प्रकरण 14,500 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीशी संबंधित आहे. ज्याचा कट हा स्टर्लिंग बायोटेक आणि त्याचे मुख्य संचालकांनी रचल्याचं म्हटलं आहे.

दुसरीकडे, बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला हिला एका वेगळ्या प्रकारणात ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. FEMA (Foreign Exchange Management Act) कायद्याच्या उल्लंघनासंदर्भात मुंबईतल्या ईडी कार्यालयाने यामी गौतमला ही नोटीस पाठवली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in