Covid19: पुणेकरांसाठी गुड न्यूज, पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी शून्य कोरोना मृत्यू

Pune coronavirus updates: राज्यातील कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी एकाही कोरोना रुग्णांच मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे.
Covid19: पुणेकरांसाठी गुड न्यूज, पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी शून्य कोरोना मृत्यू
pune coronavirus updates Zero corona death for second day in a row Pune(फाइल फोटो)

महाराष्ट्रात पुणे हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. सर्वाधिक रुग्ण आणि मृतांची संख्या ही पुण्यात होती. पण मागील दोन दिवसांपासून पुणेकरांना अत्यंत मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही सलग दुसऱ्या दिवशी शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. पुण्यात कोरोनाची स्थिती ही अत्यंत गंभीर होते. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रुग्णांना वेळेवर बेडही उपलब्ध नसल्याचं अनेकदा पाहायला मिळालं होतं. अशा परिस्थिती पुण्यातील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीला आता मोठं यश येत आहे.

महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण हा पुण्यात आढळून आला होता. त्यानंतर कोरोना मुंबईसह राज्याच्या इतर भागात पसरला होता. मागील दोन वर्षांपासून पुणे जिल्हा हा कोरोनाशी सातत्याने लढा देत आहे. आता या लढ्याला हळूहळू यश येत आहे. कारण सलग दुसऱ्या दिवशी पुणे शहरात शून्य कोरोना मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांसाठी ही बाब निश्चित दिलासादायक आहे. कारण यामुळे पुणेकरांना आता दिवाळी सण मनसोक्तपणे साजरा करता येणार आहे

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी एकाही कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचं पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.

'सलग दुसऱ्या दिवशी एकही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू नाही! पुण्यात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. सलग दोन दिवस शून्य मृत्यू हे आपल्या सर्वांचे मोठे यश आहे. विशेषतः सलग दीड वर्षे लढणाऱ्या आरोग्य यंत्रणेचे. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवादही.' असं ट्विट त्यांनी केलं आहे.

pune coronavirus updates Zero corona death for second day in a row Pune
Covid19: महाराष्ट्रात 1573 नवीन रूग्णांचं निदान, 39 मृत्यूंची नोंद

पुण्यात आज किती रुग्ण आढळून आले?

पुणे शहर हद्दीत आज 79 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. पुण्यात सध्या 163 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. दिवसभरात पुण्यात 83 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 984 इतकी आहे.

मुंबईत काय आहे परिस्थिती?

मुंबईत गेल्या 24 तासांत 429 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 435 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट हा 97 टक्के इतका असून, कोरोना संसर्गाचा दर 0.05 टक्के एवढा आहे. सध्या मुंबईत 4537 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, रुग्ण दुप्पटीचा वेग 1328 दिवसांवर गेला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in