पुणेकरांना दिवाळीआधी दिलासा! दिवसभरात शून्य कोरोना मृत्यू

राज्यातील कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात दिवसभरातही एकही मृत्यू नाही : नागरिक आणि यंत्रणांच्या प्रयत्नांंना यश
पुणेकरांना दिवाळीआधी दिलासा! दिवसभरात शून्य कोरोना मृत्यू
संशयित रुग्णांचा स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी. (प्रातिनिधीक छायाचित्र)india today

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडलेल्या आणि महामारीचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याला आज मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे निर्बंधांच्या मगरमिठीत अडकलेल्या मुंबईपाठोपाठ पुण्यातही आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाच्या प्रयत्न मोठ यश आलं आहे.

महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण पुण्यात आढळून आला होता. त्यानंतर कोरोना मुंबईसह राज्याच्या इतर भागात पसरला होता. गेल्या दोन वर्षांपासून पुणे शहर कोरोनाशी लढा देत आहे. अखेर या लढ्याला बळ देणारी घटना आज घडली असून, शहरात प्रथमच शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करून ही आनंदवार्ता पुणेकरांसोबत शेअर केली आहे. 'पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय', असं महापौर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

संशयित रुग्णांचा स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी. (प्रातिनिधीक छायाचित्र)
मुंबईच्या कोरोनाविरोधी लढ्याला बळ देणारी बातमी! 18 महिन्यांनंतर शून्य मृत्यूची नोंद

पुण्यात आज किती रुग्ण आढळून आले?

पुणे शहर हद्दीत आज ११२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात सध्या १५१ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर १७८ रुग्णांना ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. दिवसभरात पुण्यात ११८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ९८८ इतकी आहे.

संशयित रुग्णांचा स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी. (प्रातिनिधीक छायाचित्र)
शून्य कोरोना मृत्यूचं मुंबई मॉडेल काय आहे?

मुंबईतील परिस्थिती कशी?

मुंबईत गेल्या 24 तासांत 463 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर 558 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका असून, कोरोना संसर्गाचा दर 0.05 इतका आहे. सध्या मुंबईत 4550 रुग्ण उपचाराधीन असून, रुग्ण दुप्पटीचा वेग 1324 इतका आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in