आर्यन खानला जामीन, किरण गोसावी अडकला, पुणे कोर्टाकडून गोसावीला पोलीस कोठडी

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आर्यन खानवर कारवाई झालेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB चा साक्षीदार किरण गोसावीला पुणे कोर्टाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. किरण गोसावीवर पुण्यातील एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल आहे. आर्यन खान प्रकरणात किरण गोसावीचा सेल्फी समोर आल्यानंतर पुणे पोलीस त्याच्या शोधात होते.

गोसावीने स्वतःला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्वाधिन केल्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेत कारवाई केली आहे.

आर्यन खानची दिवाळी ‘मन्नत’वर; बॉम्बे हायकोर्टाने केला जामीन मंजूर

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

किरण गोसावीला पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमधून कोर्टासमोर हजर करण्यात आलं. किरण गोसावी हा आर्यन खानच्या अटकेनंतर काही दिवस गायब झाला होता. पुणे पोलिसांनी कोर्टाकडे गोसावीची १० दिवसांची पोलीस कोठडी मागितली. तक्रारदार चिन्मय देशमुख या तरुणाकडून घेतलेल्या पैशांचा तपास करण्यासाठी पोलिसांना किरण गोसावीच्या बँक खात्याची चौकशी करावी लागणार आहे.

या प्रकरणात पुणे पोलिसांनी किरण गोसावीच्या महिला साथीदाराला अटक केली होती. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, किरण गोसावीने बनावट कागदपत्रांच्या आधारे या महिलेच्या नावाने बँक अकाऊंट सुरु केलं. या सर्व गोष्टींच्या तपासाकरता पोलिसांना पुरेसा वेळ मिळणं गरजेचं असून यासाठी १० दिवसांची पोलीस कोठडी सरकारी वकीलांनी मागितली.

ADVERTISEMENT

याचसोबत पुणे पोलिसांनी किरण गोसावी विरुद्ध IPC च्या ४५६ आणि ४६८ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सरतेशेवटी दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने किरण गोसावीला ८ दिवस पोलीस कोठडीत पाठवलं आहे.

ADVERTISEMENT

जाणून घ्या पुण्यात गोसावीविरुद्ध काय गुन्हा दाखल झाला आहे?

पुणे आणि पुणे परिसरातील तरुणांकडून नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपये या ठिकाणी केपी गोसावी याने उकळले होते. पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या एका तरुणाकडून गोसावीने मलेशियात नोकरी लावून देतो असं अमिष दाखवून 3 लाख रुपये उकळले होते.

चिन्मयने हे पैसे गोसावीला दिले, ज्यानंतर त्याला मलेशियात पाठवण्यातही आलं. परंतू मलेशियाला पोहचल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं चिन्मयला लक्षात आलं. चिन्मय यानंतर पुण्यात परत आला आणि त्याने किरण गोसावीकडे आपले पैसे परत मागितले, यावेळी गोसावीने चिन्मयला जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर चिन्मय देशमुखने पोलिसांत गोसावीविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पुणे पोलीस गोसावीच्या शोधात होते, परंतू दरम्यानच्या काळात तो फरार झाला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT