
महाराष्ट्र सरकारने होम आयसोलेशन अर्थात गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोध दर्शवला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज होम आयसोलेशन बंद करून रूग्णांना कोरोना रूग्णांना कोव्हिड सेंटरमध्ये उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पुण्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे त्यामुळे असा निर्णय अव्यहार्य आहे असा टोलाही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लगावला आहे. राज्य सरकारने पुणे शहरात रूग्णसंख्या कमी होत असताना असा निर्णय कसा घेतला? असा प्रश्न मुरलीधर मोहोळ यांना विचारला.
मुरलीधर मोहोळ यांनी काय उत्तर दिलं?
राज्य सरकारने निर्णय घेतला असेल तर आम्हाला त्याचं पालन करावं लागेल. मात्र फ्लॅट, बंगला, मोठ्या इमारतींमध्ये राहणारे लोक कोव्हिड सेंटरमध्ये कसे राहतील? असा प्रश्न विचारून निर्णयाचा फेरविचार करावा अशीही मागणी मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.
पाहा कोणकोणत्या जिल्ह्यात यापुढे होम आयसोलेशन बंद असणार आहे:
कोल्हापूर
सांगली
सातारा
यवतमाळ
अमरावती
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
सोलापूर
अकोला
बुलढाणा
वाशिम
बीड
गडचिरोली
अहमदनगर
उस्मानाबाद
होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला?
राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. पण हा निर्णय नेमका घेण्यात आला हे आपण जाणून घेऊया?
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. अशावेळी रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी सरकारने आता काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय देखील सरकारकडून घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून आरोग्य यंत्रणा आणि सरकारच्या असं निदर्शनास आलं आहे की, राज्यात होम आयसोलेट असलेले अनेक कोरोना पॉझिटिव्ह लोक हे राजरोसपणे बाहेर फिरत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.