Corona प्रतिबंधक लस घेण्यासाठी आलेल्या महिलेला दिलं रेबीजचं इंजेक्शन, ठाण्यातला धक्कादायक प्रकार

डॉक्टर आणि नर्स दोघांचं निलंबन
Corona प्रतिबंधक लस घेण्यासाठी आलेल्या महिलेला दिलं रेबीजचं इंजेक्शन, ठाण्यातला धक्कादायक प्रकार
संग्रहित छायाचित्र प्रतीकात्मक फोटो

विक्रांत चौहान, ठाणे, प्रतिनिधी

ठाण्यातल्या कळवा भागात एका महिलेला कोरोना प्रतिबंधक लसीच्या ऐवजी रेबीजचं इंजेक्शन दिलं गेलं. या प्रकरणी आरोग्य केंद्रावर आलेल्या महिलेला रेबीजची लस दिली गेली. या प्रकरणी आरोग्य केंद्रावर असलेल्या जबाबदार नर्स आणि डॉक्टरला निलंबित करण्यात आलं आहे. ठाण्यात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काही दिवसांपूर्वी एका महिलेला तीन डोस देण्यात आले होते. त्यानंतर लसीकरणासाठी अभिनेत्री मीरा चोप्राला कोविड सेंटरची सुपरवायजर दाखवण्यात आल्याचा प्रकार मे महिन्यात घडला होता. आता कोरोनाची लस घेण्यासाठी गेलेल्या महिलेला रेबीजचं इंजेक्शन दिल्याचा प्रकार घडला आहे.

संग्रहित छायाचित्र
लस घेण्यासाठी अभिनेत्री झाली कोविड सेंटरची सुपरवायजर, ठाण्यातील धक्कादायक प्रकार उघड

याप्रकरणाची ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी दाखल घेत तातडीने मंगळवारी बैठक बोलवून यातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने त्या केंद्रावरील डॉक्टरासह लस देणाऱ्या परिचरिकेवर निलंबनाची कारवाई केली आहे. तर रेबीज लस दिलेल्या व्यक्तीची प्रकृती उत्तम असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून ठामपामध्ये निलंबनाचे सत्र सुरूच आहे.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या कळवा, आतकोनेश्वर नगर भागात महापालिकेचे आरोग्य केंद्र आहे. त्या केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्या केंद्रांवर एका व्यक्तीला कोरोना लसीऐवजी रेबीजची लस देण्यात आल्याची बाब पुढे आली.

संग्रहित छायाचित्र
लसीसाठी बनावट ओळखपत्र : आणखी एका अभिनेत्रीचं नाव समोर, ठाणे मनपाच्या अहवालात धक्कादायक खुलासा

मंगळवारी महापौर दालनात महापालिकेच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. अशा वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे महापालिकेची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून येथील डॉक्टरासह परिचरिकेला निलंबन करण्यात आले आहे.कोरोना लस ऐवजी रेबीज लस दिल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे. तर ज्या व्यक्तीला रेबीजची लस दिली गेली आहे.त्या व्यक्तींची प्रकृती उत्तम आहे. तसेच या प्रकरणी डॉक्टर आणि एका परिचरिकेला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती ठामपा अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.

Related Stories

No stories found.