'भारत जोडो यात्रेत बुलेटप्रूफ कारमधून कसा प्रवास कसा करू?'- राहुल गांधी

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या सुरक्षेत झालेला हलगर्जीपणा आहे. या हलगर्जीपणामुळे काँग्रेसच्यावतीने गृहमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले होते.
Rahul Gandhi ask question to bjp sarkar
Rahul Gandhi ask question to bjp sarkar

Rahul Gandhi: नवी दिल्ली: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (Congress committee) कार्यालयात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, 'मी भारत जोडो यात्रा करत आहे. भारत जोडो यात्रा बुलेटप्रूफ वाहनात (BulletProof Vehicle) करावी, अशी सरकारची इच्छा आहे, सरकार (BJP Sarkar) म्हणत आहे की, आम्हाला त्रास देऊ नका. तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीर बुलेटप्रूफ वाहनात प्रवास करा. परंतु, हे मला पटत नाही. भारत जोडो यात्रेत मी बुलेटप्रूफ कारमध्ये बसून कसा प्रवास कसा करू शकतो?' असा सवाल राहुल गांधींनी केला आहे. (Rahul Gandhi Says Bharat Jodo Yatra Cannot Do By Sitting In Bullet Proof Vehicle)

राहुल गांधी यांनी केलेल्या या विधानामागील कारण म्हणजे, भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या सुरक्षेत झालेला हलगर्जीपणा आहे. या हलगर्जीपणामुळे काँग्रेसच्यावतीने गृहमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले होते. यासंदर्भात सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी स्वत: प्रोटोकॉल तोडतात असे त्यांचे म्हणणे आहे. या कारणामुळे भाजप सरकारने राहुल गांधींवर हल्लाबोल केला.

Rahul Gandhi ask question to bjp sarkar
Rahul Gandhi: पंतप्रधान झालात तर, सर्वात आधी काय कराल? दिलं उत्तर...

सरकारच्या वक्तव्यामुळे राहुल गांधींना लगावला टोला!

यावेळी राहुल गांधींनी भाजप सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'भारत जोडो यात्रेत मी बुलेट प्रूफ गाडीत कसा बसू शकतो हे तुम्ही मला समजावून सांगा. भाजपचे ज्येष्ठ नेते बुलेट प्रूफ वाहनातून बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्याकडे एकही पत्र जात नाही. भाजपच्या नेत्यांनी रोड शो केले, खुल्या जीपमधूनही गेले. हे त्यांच्याच प्रोटोकॉलच्या विरोधात आहे आणि हे सरकारी लोक मला लिहितात की, मी बुलेट प्रूफ वाहनातून बाहेर पडू नये. त्यांच्यासाठी प्रोटोकॉल वेगळा आणि माझ्यासाठी वेगळा असणार. माझ्या सुरक्षेसाठी काय करावे हे सर्व वरिष्ठ सीआरपीएफ लोकांना माहीत आहे. मी भारत जोडो यात्रेत फिरतोय, मग बुलेट प्रूफ वाहनात बसून कसा प्रवास करणार?'

राहुल गांधींच्या प्रत्येक हालचालींवर टीका!

राहुल गांधींनी केलेली कोणतीही गोष्ट टीकेचा मुद्दा बनते. काही दिवसांपूर्वीच कडाक्याच्या थंडीत ते फक्त टी-शर्ट परिधान केलेले दिसले. काहींनी यावर जोरदार टीका केली. हे राजकीय षडयंत्र असल्याचेही म्हणण्यात आले होते. यावर ते म्हणाले होते की, 'तुम्हाला थंडीची भीती वाटते, म्हणूनच तुम्ही स्वेटर घालता, मला भीती वाटत नाही. मला थंडी जाणवतही नाहीये, पण हिवाळा सुरू होताच मी स्वेटर घालेन असा विचार करतोय.'

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in