‘Rahul Shewale ची बायको रडत मातोश्रीवर आलेली’, खैरेंचे गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

इशरार चिश्ती, प्रतिनिधी (औरंगाबाद)

Chandrakant Khaire: औरंगाबाद: बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput)याच्या मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी राहुल शेवाळेंवर अत्यंत गंभीर आरोप टीका केले आहेत. ‘राहुल शेवाळेंचा संसार उद्धव ठाकरेंनी वाचवला.’ असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी गंभीर असे आरोप केले आहेत. (rahul shewales married life was saved because of uddhav thackeray replied chandrakat khaire)

पाहा चंद्रकांत खैरे यांनी नेमकं काय म्हटलंय:

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खासदार राहुल शेवाळे हे विचित्र आहेत आणि अशा विचित्र माणसाबाबत काय बोलायचं. पण मला त्याचं प्रत्यक्षात भांडं फोडायचंय. आज तो मातोश्री, उद्धवजी आणि आदित्यजीवर आरोप करतोय. तो काय होता ते मला माहिती आहे.

‘आम्ही लोकसभेत असताना त्याने इश्क करतानाचे फोटो आम्ही पाहिले. तो एका पत्रकार महिलेसोबत आठ-आठ दिवस जायचा फॉरेनला. त्याची बायको मातोश्रीवर आली. मी स्वत: साक्षी आहे त्याचा. ती तेव्हा रडायला लागली उद्धव साहेबांसमोर.’

ADVERTISEMENT

‘तिने सांगितलं… माझं सगळं आयुष्य याने बरबाद केलं. मला रोज मारझोड करतो हा आणि त्या पत्रकार बाईबरोबर फिरतोय हा.’

ADVERTISEMENT

राहुल शेवाळे विरुद्ध आदित्य ठाकरे : सुशांतसिंह राजपुत प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांची राळ

‘तेव्हा उद्धव ठाकरेंनी हे सगळं मिटवलं आणि त्यांचा संसार चांगला करुन दिला. अशा उद्धवजींच्या विरोधात हा जातो. ज्या ताटात खातो त्याच ताटात छेद करतो.. म्हणून हा माणूस किती कसा ते कळलंच. याने आता यानंतर समजा मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंबाबत बोलला तर आम्ही मराठवाड्याचे शिवसैनिक त्याला दाखवून देऊ काय आहोत ते. सरळ करुन टाकू त्याला.’

‘असे कित्येक येणार आणि कित्येक जाणार. यापुढे तो मुंबईतून निवडून येणारच नाही’ असं म्हणत चंद्रकांत खैरेंनी राहुल शेवाळेंचा खरपूस समाचार घेतला आहे.

Rahul Shewale : माझ्या बदनामीमागे आदित्य ठाकरे! त्यांनी मला संस्कृती शिकवू नये

राहुल शेवाळेंनी नेमके काय आरोप केले होते?

‘सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. परंतु, या तिघांच्या तपासाची माहिती जनतेपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे जनतेच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांची उत्तरं जनतेला मिळाली पाहिजेत. ड्रग्जसंबंधात रियाची चौकशी करण्यात आली होती.’

‘सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला जे कॉल आले होते, त्यासंदर्भात बिहार पोलिांच्या तपासात उल्लेख आहे. रियाला ते कॉल AU या नावाने आले होते, असे बिहार पोलिसांनी म्हटले होते.;

‘परंतु, मुंबई पोलिसांनी AU म्हणजे रियाची मैत्रिण अनया उदास असल्याचं महटलं होतं. मात्र, AU चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, अशी माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे. सीबीआयने याबाबतची माहिती अद्याप लोकांसमोर आणलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाच्या तपासाची माहिती जनतेला मिळावी म्हणून मी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला.’ अशा स्वरुपाचे आरोप शेवाळेंनी केले होते. ज्यावरुन आता महाराष्ट्रातील राजकारण बरंच तापलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT