'आम्ही जा म्हटलेलं नव्हतं, पण आता...'; शिवसेना आमदाराचं बंडखोर आमदारांना प्रत्युत्तर

rajan salvi : उदय सामंत, दिपक केसरकर ही मंडळी राष्ट्रवादीतून आली होती, काय म्हणाले आहेत बंडखोर आमदार?
Rajan salvi on rebel mla uday samant deepak kesarkar
Rajan salvi on rebel mla uday samant deepak kesarkar

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार अस्तित्वात आलं असलं, तरी शिवसेनेतील संघर्षाला अजूनही पूर्णविराम मिळालेला नाही. शिंदे गटातील आमदारांकडून मांडल्या जात असलेल्या भूमिकांवर शिवसेनेकडूनही उत्तर दिली जात असल्याचं दिसत आहे. शिवसेनेविरोधात बंड केलेल्या आमदारांबद्दल राजन साळवी यांनीही भूमिका स्पष्ट केली असून, भविष्यात धनुष्यबाण निशाणीवर निवडणूक लढवणारा विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना राजन साळवी आज रत्नागिरी येथे बोलत होते. शिवसेनेविरुद्ध बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांबद्दल बोलताना राजन साळवी म्हणाले, "धनुष्यबाण ही निशाणी शिवसेनेचीच आहे, आणि हीच निशाणी आमची कायमस्वरूपी राहिल."

Rajan salvi on rebel mla uday samant deepak kesarkar
'धर्मवीर'मधल्या नथुराम गोडसेचा कात्री लावलेल्या सीनसह काय होते एकनाथ शिंदेंच्या बंडाचे संकेत?
रत्नागिरी-सिंधुदुर्गातील एकूण ३ आमदार शिंदे गटात गेले आहेत. याबाबत विचारलं असता, राजन साळवी म्हणाले, "संपूर्ण कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यामध्ये उदय सामंत, दिपक केसरकर ही मंडळी राष्ट्रवादीतून आली होती. शिवसैनिकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे हे त्यांनाही आणि जनतेनेलाही माहिती आहे."

"भविष्यात जे शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर उभे राहतील, ते निवडून येतील. शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल," असा विश्वास राजन साळवी यांनी व्यक्त केला.

"जे आता शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना सोडून गेले आहेत. जे दूर गेलेले आहेत, त्यांना आम्ही जा असं म्हटलेलं नव्हतं. त्यांना वाटलं म्हणून ते गेलेले आहेत. आता दिल्या घरी सुखी रहा," असा टोला राजन साळवी यांनी बंडखोर आमदारांना लगावला.

Rajan salvi on rebel mla uday samant deepak kesarkar
आधी उद्धव ठाकरेंसाठी रडले, नंतर शिंदे गटात गेले; निर्णय बदलण्यावर संतोष बांगर काय म्हणाले?

"रिफायनरी प्रकल्प व्हावा हीच माझी भूमिका -राजन साळवी

"रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील बेरोजगारी शंभर टक्के दूर होईल. या प्रकल्पामुळे माझा जिल्हा आणि राज्याची प्रगती होईल हा मला विश्वास आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाच्या दृष्टीने पंतप्रधानांना एक पत्र दिलं होतं. त्यामुळे शिवसेनेचा स्थानिक आमदार म्हणून प्रकल्प या ठिकाणी व्हावा ही माझी आजही भूमिका आहे," असं राजन साळवी यांनी पुन्हा स्पष्ट केलं.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने शिवसेना उपनेते राजन साळवी यांनी उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र, पक्षाकडून उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. "माझ्यासारख्या एका शिवसैनिकाला विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी शिवसेनेकडून देण्यात आली, हाच माझ्यासाठी एक भाग्याचा क्षण आहे."

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in