एअर इंडिया कर्मचाऱ्याला मारहाण : माजी खासदार रविंद्र गायकवाडांना दिलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बिजनेस क्लासचं तिकीट दिलं नाही म्हणून विमानात एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्याप्रकरणात शिवसेनेचे माजी खासदार रविंद्र गायकवाड यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. २०१७ रोजी घडलेल्या घटनेनंतर गायकवाड यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, खोटी माहिती आणि पुरावे नष्ट करणे आणि मारहाण या कलाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दिल्लीतील कोर्टाने गायकवाड यांची सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि पुरावे नष्ट केल्याच्या कलमातून मुक्तता केली आहे. यापुढे गायकवाड यांच्याविरुद्ध मारहाणीचा खटला चालणार आहे.

मारहाण केल्याच्या आरोपात रविंद्र गायकवाड सकृतदर्शनी दोषी असल्याचं दिसत असून या IPC 355 अंतर्गत त्यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे गायकवाड यांच्यासाठी हा दिलासा मानला जात आहे.

१० दिवसांसाठी चौकशी स्थगित करा ! परमबीर सिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे हे प्रकरण ?

मार्च २०१७ मध्ये शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड हे एअर इंडियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला जात होते. यावेळी बैठक व्यवस्थेवरून गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केली. घटनेनंतर एअर इंडियाचे कर्मचारी आणि रवींद्र गायकवाड यांच्यामधल्या वादाचा व्हि़डिओ व्हायरल झाला होता.

ADVERTISEMENT

आयुक्तांवरील शाईफेक प्रकरण : आमदार रवी राणांना दिलासा ! कोर्टाकडून ट्रान्झिट बेल मंजूर

ADVERTISEMENT

बिझनेस क्लासचं तिकीट असूनही मला इकोनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आले. याचा जाब मी त्या कर्मचाऱ्याला विचारला असता, त्याने मला दाद दिली नाही. मला अपशब्द वापरले आणि त्यानंतर आपण मारहाण केल्याचे गायकवाड यांनी त्यावेळी माध्यमांसमोर सांगितले होते. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे अन्याय सहन करणारा नाही, गप्प बसायला मी काही भाजप खासदार नाही असे माध्यमांसमोर केलेले तत्कालीन वक्तव्य त्यावेळी चांगलेच गाजले होते.

एअर इंडिया कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरण नंतर रवींद्र गायकवाड देशभर चर्चेत आले होते त्यानंतर शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर एअर इंडियाने विमानप्रवास करण्याची बंदी घातली होती काही काळाने ती मागेही घेतली होती. माध्यमांचा पाठलाग सोडविण्यासाठी माजी खासदार गायकवाड यांनी केलेले वेशांतर २०१७ मध्ये चांगलेच गाजले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT