BMC ने Restaurants सुरू करावीत मुंबईकरांनी पत्र लिहून केली मागणी

वाचा सविस्तर या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?
BMC ने Restaurants सुरू करावीत मुंबईकरांनी पत्र लिहून केली मागणी

BMC ने म्हणजेच मुंबई महापालिकेने आता रेस्तराँ उघडण्यास संमती द्यावी या आशयाचं पत्र रेसिडेंट असोसिएशन ऑफ जुहूने मुंबई महापालिकेला लिहिलं आहे. कारण सध्या लॉकडाऊन असल्याने आणि मुंबईतली रेस्तराँ बंद असल्याने अनेक लोक रस्त्याच्या कडेला लागणाऱ्या गाड्यांवरचे पदार्थ खातात त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडू शकते. तसंच हे पदार्थ खाऊन त्यांची प्रकृती बिघडली तर त्यांची प्रतिकार शक्तीही कमी होऊ शकते. त्यामुळे आता मुंबईतली रेस्तराँ सुरू करण्यात यावीत अशी मागणी करणारं पत्र रेसिडेंट असोसिएशनने लिहिलं आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त I S चहल यांना उद्देशून हे पत्र मुंबईकरांनी लिहिलं आहे. ही असोसिएशन 14 को ऑपरेटिव्ह सोसायटींची आहे. ज्यामध्ये JVPD योजनतेल्या 720 इमारतीही सहभागी आहेत. एकीकडे JVPD हाऊसिंग असोसिएशन लिमिटेडने लसीकरण शिबीरं सुरू केली आहेत. तर दुसरीकडे फेरीवाल्यांकडून जे लोक अन्न विकत घेतात किंवा गाड्यांवर गर्दी करून जे अन्न इथले लोक खातात त्याबाबत चिंताही व्यक्त केली आहे. तसंच हे घडू नये म्हणून रेस्तराँ सुरू करा अशीही मागणी करण्यात आली आहे.

JVPD योजनेतल्या लोकांनी जे पत्र लिहिलं आहे त्या मागणीला स्थानिक लोकप्रतिनिधींनीही पाठिंबा दिला आहे. मुंबई महापालिकेने आता रेस्तराँ आणि व्यावसायिक दुकानं उघडली पाहिजेत. या भागांमधली कोरोनाची प्रकरणं मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहेत त्यामुळे इथे पुन्हा सगळ्या गोष्टी सुरू करायला मुंबई महापालिकेने काही हरकत घेऊ नये असं मत नगरसेवक रेणू हंसराज यांनी व्यक्त केलं.

BMC ने Restaurants सुरू करावीत मुंबईकरांनी पत्र लिहून केली मागणी
BMC च्या सूचनांना आदित्य ठाकरेंकडूनच हरताळ, लसीकरणाच्या कार्यक्रमात बॅनरबाजी

या सोसायटी असोसिएशनचे अध्यक्ष परमजीत सिंग घई म्हणाले की, 'एक नियम ठरवा, ज्यांच्याकडे खाद्य पदार्थ विकण्याचा परवाना आहे त्यांनाच या ठिकाणी संमती द्या. तसंच त्यांना कोव्हिडचे सगळे निर्बंध पाळण्याचीही अट टाका. असं झालं तर लोक रेस्तराँमध्ये जाऊन सोशल डिस्टन्सिंग ठेवून त्यांना हवं आहे ते खाऊ शकतील. दर्जेदार खाणं त्यांना खाता येईल तसंच आरोग्यदायी नसणारे पदार्थ खाण्यापासून ते वाचू शकतील'

आणखी काय म्हटलं आहे पत्रात?

Lockdown च्या कालावधीत लोकांनी संमय दाखवला आहे. तसंच सरकारने सांगितलेल्या सगळ्या नियमांचं पालन केलं आहे. मात्र आता लोकांना त्यांचं नेहमीचं आयुष्य जगण्याची इच्छा आहे. त्यांचे व्यवसायही इतके दिवस बंद आहेत त्यामुळे अनेक लोक निराश झाले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये एक प्रकराची मानसिक अशांतता निर्माण झाली आहे याचाही विचार केला जावा.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in