निवृत्त IPS अधिकारी ए.ए.खान यांचं निधन, कुख्यात गुंड माया डोळसचा केला होता एन्काऊंटर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई पोलीस दलातले माजी IPS अधिकारी ए.ए.खान यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी मुंबईतल्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतला एकेकाळचा कुख्यात गुंड माया डोळचा एन्काऊंटर केल्यामुळे खान प्रकाशझोतात आले होते. यावर शुट आऊट अॅट लोखंडवाला हा सिनेमाही आला होता.

१६ नोव्हेंबर १९९१ रोजी अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये घडलेल्या एन्काऊंटरमध्ये खान आणि त्यांच्या पथकाने माया डोळस आणि त्याच्या सहकाऱ्यांचा एन्काऊंटर केला होता. ए.ए. खान हे आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जायचे. मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्येही त्यांची जरब होती. त्यांच्या निधनामुळे मुंबई पोलीस दलाने एक उमदा अधिकारी गमावल्याची भावना बोलून दाखवली जात आहे.

कुख्यात गुंड माया डोळसवर खंडणी, हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. मुंबईच्या रस्त्यावर त्या काळात माया डोळसची दहशत होती. खान यांनी ही दहशत संपवली होती. लोखंडवाला चित्रपटात संजय दत्तने खान यांची भूमिका बजावली होती. विवेक ओबेरॉयने माया डोळचं पात्र साकारलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT