Corona: महाराष्ट्र-दिल्लीत महाप्रचंड वेगाने वाढतोय पॉझिटिव्हिटी रेट,आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली चिंता

जाणून घ्या आणखी काय काय म्हटलं आहे आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी?
Corona: महाराष्ट्र-दिल्लीत महाप्रचंड वेगाने वाढतोय पॉझिटिव्हिटी रेट,आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली चिंता

देशात सध्या कोरोनाचे 82 हजार सक्रिय रूग्ण आहेत. मागच्या 24 तासात 10 हजारांहून जास्त कोरोना रूग्ण देशात आढळले आहेत. 33 दिवसात पहिल्यांदाच एवढी मोठी रूग्णवाढ झाली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांमध्ये टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Corona: महाराष्ट्र-दिल्लीत महाप्रचंड वेगाने वाढतोय पॉझिटिव्हिटी रेट,आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली चिंता
लस घेतलेल्यांचंही 'ओमिक्रॉन'ने वाढवलं टेन्शन! केंद्राच्या माहितीनंतर तज्ज्ञांचा इशारा

केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की देशातल्या आठ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांहून जास्त आहे. तर 14 जिल्हे असे आहेत जिथे आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान आहे. महाराष्ट्रात 9 डिसेंबरला पॉझिटिव्हिटी रेट 0.76 टक्के होता. तो आता 2.3 टक्के आहे. तर बंगालमध्ये 1.61 टक्के पॉझिटिव्हिटी रेट होता जो आता 3.1 टक्के इतका झाला आहे.

कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

देशात ओमिक्रॉनचे 961 रूग्ण

देशात आत्तापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 961 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आङेत. त्यातले 320 रूग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी दिल्लीत ओमिक्रॉनचे 263 रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी 57 जण बरे झाले आहेत. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत 252 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ओमिक्रॉनचे गुजरातमध्ये 97, राजस्थानमध्ये 69, केरळमध्ये 65, तेलंगणामध्ये 62, तामिळनाडूत 45, कर्नाटकमध्ये 34, आंध्रप्रदेश 16, हरयाणा 12, बंगाल 11, मध्यप्रदेश 9, ओदिशामध्ये 9, उत्तराखंडमध्ये 4, छत्तीसगढ 3, जम्मू काश्मीरमध्ये 3, उत्तर प्रदेशात 2, गोवा, हिमाचल प्रदेश, लडाख, मणिपूर आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे. देशातल्या ओमिक्रॉनने बाधित रूग्णांची संख्या 961 झाली आहे.

Corona: महाराष्ट्र-दिल्लीत महाप्रचंड वेगाने वाढतोय पॉझिटिव्हिटी रेट,आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली चिंता
Arjun Kapoor : अभिनेता अर्जून कपूर कोरोना पॉझिटिव्ह, मलायकाचीही होणार चाचणी

लव अग्रवाल यांनी हे पण सांगितलं की जगभरात 2.68 कोटी सक्रिय रूग्ण हेत. तर रोजच्या अॅव्हरेज केसेस 10 लाख आहेत. 29 डिसेंबरला जगभरात कोरोनाचे 17 लाख रूग्ण आढळले. अमेरिकेत 28.8 टक्के, ब्रिटनमध्ये 12.5 टक्के, फ्रान्समध्ये 10.1 टक्के तर स्पेनमध्ये 6.7 टक्के रूग्ण आढळले आहेत असंही लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in