'जातीभेद, धर्मभेद विसरा, सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हेच खरं हिंदुत्व'

सुरतमधल्या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य
'जातीभेद, धर्मभेद विसरा, सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हेच खरं हिंदुत्व'
RSS chief Mohan Bhagwat's big statement on caste and religion

जातीभेद, धर्मभेद विसरा सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हेच खरं हिंदुत्व आहे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुरतमधे केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे कायमच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी हिंदू धर्म आणि हिंदुत्वाबाबत ही आणखी एक व्याख्या सांगितली आहे. हिंदुत्व हे सगळ्यांना एकजुटीने पुढे जाईल असं म्हटलं आहे. सुरतमधल्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हिंदुत्व म्हणजे सर्व लोकांसोबत एकजुटीने चालते ती संस्कृती होय. केवळ पूजा पद्धतीवरून एकमेकांमध्ये भेद करणं चुकीचं आहे. सर्वांना बरोबर घेऊन एकसाथ पुढे चालते तेच खरे हिंदुत्व आहे, अशा शब्दात भागवत यांनी हिंदुत्वाची संकल्पना मांडली आहे.

सिंधू नदीच्या दक्षिणेला राहतात ते हिंदू म्हणून ओळखले जातात. आपल्या सर्वांनी आता एकत्र उभे राहण्याची गरज आहे. धर्मभेद जातीभेद विसरून आपण सर्वांनी आता एकत्र काम करायला हवं, असं देखील मत मोहन भागवत यांनी यावेळी मांडलं आहे.

दरम्यान, बुधवारी भागवत यांनी सुरत मधील विज्ञान केंद्रात हिंदुत्वावर विचारवंतांच्या मेळाव्याला संबोधित केले. या मेळाव्याला डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील अशा विविध घटकांतील दीडशेहून अधिक लोक उपस्थित होते. यावेळी भागवत यांनी संघाची हिंदुत्वाबद्दल असणारी व्याख्या सांगितली.

7 सप्टेंबरला मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचीही झाली होती चर्चा

'भारतातील हिंदू-मुसलमान यांचे पूर्वज एकच आहेत. आपण भारतीय संस्कृतीचे वारसदार आहोत, पण ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर निर्माण केलं. तेव्हापासून आपण भांडण आहोत', असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलं होतं. 'देशाला अग्रेसर करण्यासाठी सर्वांना सोबत प्रयत्न करावे लागतील', असं आवाहनही सरसंघचालकांनी केलं होतं.

'सर्व भारतीयांच्या एकतेचा आधार आपली मातृभूमी व देशाच्या गौरवशाली परंपरा आहेत. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुसलमानांचे पूर्वज एकच आहेत. आपल्या दृष्टीने हिंदू हा शब्द आपली मातृभूमी, पूर्वज आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांचा प्रतिशब्द आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक भारतीय नागरिक हिंदूच आहेत, असं मानतो', असं सरसंघचालक म्हणाले होते. त्या पाठोपाठ आता त्यांनी बुधवारी केलेल्या भाषणात हिंदुत्व हे सगळ्यांना सामावून घेणारं असलं पाहिजे असं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.