
सध्या देशातलं धार्मिक वातावरण हे ढवळून निघाल्यासारखं झालं आहे. रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन दिवशी देशातल्या काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. तसंच मशिदीवरचे भोंगे विरूद्ध हनुमान चालीसा हा वादही रंगला आहे. अशात आता साध्वी ऋतंभरा यांचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे.
काय म्हणाल्या साध्वी ऋतंभरा?
"हिंदूंनी चार मुलं जन्माला घालावीत त्यातली दोन मुलं आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेला समर्पित करा. असं केलं तर लवकच हिंदू राष्ट्र निर्माण होईल. " उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेने राम उत्सवाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात साध्वी ऋतंभरा यांचं भाषण झालं. याच भाषणात त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाल्या साध्वी ऋतंभरा?
"तुम्ही दोन मुलं जन्माला घातली आहेत. हम दो हमारे दो.. पण माझी विनंती आहे हिंदू समाजाच्या बांधवांनो दोन नाही चार मुलं जन्माला घाला. त्यातली दोन मुलं देशासाठी समर्पित करा. ती मुलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनतील. बजरंगदलाचे बजरंगदेव बनतील किंवा विश्व हिंदू परिषदेला समर्पित कार्यकर्ते बनतील"
"हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी जाती-पातींमधून बाहेर या. राष्ट्रीय अभिमान आणि स्वाभिमान असला पाहिजे. कोणताही राजकीय पक्ष जातींचं गाजर दाखवून आपल्याला मोहात पाडू शकत नाही. माझा देश आणि त्याविषयचा अभिमान तसंच देशाचं हित हेच प्रत्येकाच्या मनात हवं हिंदू जातीचा, हिंदू समाजाचा प्रत्येक हिंदू माणसाचा मंत्र हाच असला पाहिजे" असंही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे.
राम उत्सवात हजारो श्रीराम रूपांची पूजा करण्यात आली. या सुंदर प्रसंगी रामाचे भक्त होणं ही अत्यंत भाग्याची म्हावी अशीच गोष्ट आहे. रामभक्त व्हायचं असेल तर रामत्व आत्मसात करावं लागतं. देशातील राजकीय पक्षांनी हिंदूंमध्ये फूट पाडली आहे. मात्र श्रीरामांचं आचरण संपूर्ण समाजाला एकत्र आणू शकतं.