"हिंदुत्व काय करते हे पाहायचे असेल, तर माझ्या घराचा जळलेला दरवाजा पहा"

Salman Khurshid Interview : हिंदुत्वासंदर्भातील वादग्रस्त ठरलेल्या मुद्द्यावर सलमान खुर्शीद यांनी दिलं उत्तर
"हिंदुत्व काय करते हे पाहायचे असेल, तर माझ्या घराचा जळलेला दरवाजा पहा"
काँग्रेसचे नेते आणि सनराईज ओवर अयोध्या या पुस्तकाचे लेखक सलमान खुर्शीद. India Today

'सनराईज ओवर अयोध्या' या काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद लिखित पुस्तकातील काही मजकूरावरून नवा वाद उभा राहिला आहे. सलमान खुर्शीद यांनी या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटना आयएसआयएस (ISIS) आणि बोको हरमसोबत केल्याचा आरोप होतोय. याच आरोपांना सलमान खुर्शीद यां इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिलं. सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांनी ही मुलाखत घेतली. (Salman Khurshid’s house in Nainital was allegedly vandalised amid a controversy over his book ‘Sunrise Over Ayodhya’)

प्रश्न - पुस्तकात उल्लेख करण्यात आलेल्या गोष्टी खोट्या, लोकांना चिथावणी देणाऱ्या असल्याच्या मुद्दयाशी तुम्ही सहमत आहात का?

सलमान खुर्शीद - अजितबात नाही. जर असं असतं तर मी स्वतः पत्रकार परिषद बोलावली असती. जे असहमत आहेत, त्यांनी तसं म्हटलेलं नाही, फक्त तसं दाखवलं आहे आणि ते आता माझ्या नैनितालमधील घराचा दरवाजा जाळण्यापर्यंतच्या स्तराला गेले आहेत. मी जे म्हणत होतो, ते यातून सिद्ध होत नाही का? आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ज्याला ते हिंदुत्व म्हणतात, ते हिंदू धर्माच्या विरोधी आहे. जे झालं आहे, त्यातून माझं विधान खरं असल्याचं सिद्ध होतं.

प्रश्न - कोणत्याही हिेंसेचा विरोध केला गेला पाहिजे, पण ज्या आयएसआयएसने हजारो लोकांच्या हत्या केल्या, त्या दहशतवादी संघटनेशी हिंदुत्वाची तुलना करणं योग्य आहे का?

सलमान खुर्शीद - त्यांच्यामध्ये (हिंदुत्व आणि आयएसआयएस) समानता आहे, असं मी म्हणालो. ते दोन्ही एकसारखेच आहेत, असं मी म्हटलेलं नाही. त्यांच्यात काही खास गुण आहेत आणि माझ्या दृष्टीने हे गुण आहेत, धर्माचा दुरुपयोग आणि धर्माच्या विरुद्ध काम करणं. जसं की मुस्लीम जिहादी म्हटलं, तर मुस्लीम माझा धर्म आहे. पण, असं म्हणण्यापासून मी का स्वतःला वाचवू? जर कुणी धर्माचा दुरुपयोग करत असेल, तर त्याबद्दल बोलण्यापासून मी स्वतःला का थांबवू? सर्व धर्म एकसंघ राहायला हवेत, असं माझं मत आहे आणि त्यामुळे जेव्हा अयोध्येचा निकाल आला, त्याचं मी स्वागत केलं होतं.

काँग्रेसचे नेते आणि सनराईज ओवर अयोध्या या पुस्तकाचे लेखक सलमान खुर्शीद.
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ, खुर्शीद म्हणाले हा तर हिंदू धर्मावरचा हल्ला!

प्रश्न - तुमच्यावर शब्दांचा खेळ केल्याचा आरोप केला जाऊ शकतो. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वीच संघाला हे म्हणण्याची संधी दिली, असं तुम्हाला वाटत नाही का?

सलमान खुर्शीद - मग मी काय करू? मी हिंदुत्वासमोर आत्मसमर्पण करू का? जर कुणी धर्माचा दुरुपयोग करत असेल आणि फक्त निवडणुका आल्या आहेत म्हणून. मग मला माफ करा. याबद्दल आमच्या नेतृत्वाची भूमिका स्पष्ट आहे. वैचारिक भूमिकाही ठाम आहे. हिंदुत्व आणि हिंदू धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे दोन्हींची नावं वेगवेगळी आहेत. एक आहे ज्याचा निष्पाप लोकांना मारण्यावर विश्वास आहे, तर दुसरा बंधुभावाने नांदण्यावर विश्वास ठेवतो.

प्रश्न - तुम्ही हे विधान अतिशयोक्तीपूर्ण केल्याचं मत तुमच्याच पक्षातील नेते गुलाम नबी आझाद यांचंही आहे.

सलमान खुर्शीद - खुप खुप आभार. मग गुलाम नबी आझाद माझे नेते आहेत, राहुल गांधी नाही, हे खरंय का? गुलाम नबी आझाद आदरणीय व्यक्ती आहेत. पण मला माफ करा, जर मी हे जास्त बोललो आहे, असं त्यांना वाटत असेल, तर मी त्यांच्याशी असहमत आहे. मी पण विचार करतोय की असं काय अतिशयोक्तीपूर्ण बोललोय. हिंदुत्व काय करू करते हे जर तुम्हाला बघायचं असेल, तर माझ्या नैनितालमधील घराचा जळलेला दरवाजा बघा.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in