Exclusive 'सॅम डिसूझा, मनिष भानुशाली आणि किरण गोसावींनीच खंडणी मागितली' सुनील पाटील यांचा आरोप

सुनील पाटील याचा मुंबई तक सोबत संवाद
Exclusive 'सॅम डिसूझा, मनिष भानुशाली आणि किरण गोसावींनीच खंडणी मागितली' सुनील पाटील यांचा आरोप

मला अहमदाबादला पकडून ठेवलं होतं. माझं पैशांशी काही घेणंदेणं नाही. मनिष भानुशालीने मला फोन केला होता. त्याने मला सॅम डिसूझासोबत संपर्क करून दे सांगितलं असं आता सुनील पाटीलने सांगितलं आहे. इंडिया टुडेचे सिनीयर एक्झिक्युटिव्ह एडिटर साहिल जोशी यांनी सुनील पाटील सोबत फोनवरून चर्चा केली त्यावेळी सुनील पाटीलने हे उत्तर दिलं आहे. माझ्या डोक्यावर गन ठेवून स्टेटमेंट रेकॉर्ड करून घेतली आहेत. माझ्यावर हल्ला करण्यात आला त्यानंतर मला अहमदाबादला पाठवून दिला. मला मनिष भानुशालीने टीप दिली होती. पगारे जे काही बोलत आहेत त्याला काही अर्थ नाही त्यांनी ते आरोप सिद्ध करून दाखवावेत. माझं या प्रकरणाशी काही घेणंदेणं नाही असंही सुनील पाटीलने म्हटलं आहे.

मोहित कंबोजने केले होते सुनील पाटीलवर आरोप

आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा खरा सूत्रधार हा सुनील पाटील नावाचा एक व्यक्ती आहे. जो राष्ट्रवादी काँग्रसेच्या फाउंडेशनशी निगडीत आहे. 20 वर्षांपासून तो राष्ट्रवादीशी संबंधित आहे. तो मूळचा धुळ्याचा आहे. याच सुनील पाटीलचे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. अनेक मंत्र्यांशी त्याचे घरोब्याचे संबंध आहेत.

आता अनिल देशमुखांवर जी ईडीची कारवाई सुरु आहे त्यातही सुनील पाटीलचा रोल महत्त्वाचा आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे पैसे हे सुनील पाटीलच घेत होते. 2019 पासून सुनील पाटील आणि त्याची गँग ही अॅक्टिव्ह झाली होती आणि ते ट्रान्सफरचे रॅकेट चालवत होते. यामध्ये अनेक अधिकारी देखील गुंतलेले आहेत.

आर्यन खान केसमध्ये सॅम डिसूझा या व्यक्तीचं नाव समोर आलं आहे. खरं म्हणजे आर्यन खानच्या केसची सुरुवात ही 1 ऑक्टोबरपासून होते. त्याच दिवशी सुनील पाटील याने सॅम डिसूझाला पहिले व्हॉट्सअॅप केला आणि नंतर त्याला कॉल केला. यावेळी सुनील पाटीलने सॅमला सांगितलं की, त्याच्याकडे 27 जणांची लीड आहे. मला NCB अधिकाऱ्यांशी बोलणं करुन दे. सॅमने याबाबत व्ही ही सिंग या अधिकाऱ्याशी बोलणं केलं.

यानंतर सुनील पाटीलने किरण गोसावीचा नंबर सॅम डिसूझाला दिला आणि सांगितलं की, याच्याकडे खूप मोठी माहिती आहे. डिसूझाने सुनील पाटीलच्या म्हणण्यानुसार, केपी गोसवीचं व्ही व्ही सिंग यांच्यासोबत देखील बोलणं करुन दिलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in