"छत्रपती शिवरायांचं स्मरण करून..."वडील शाहू महाराजांच्या 'त्या' दाव्यानंतर संभाजीराजेंचं ट्विट!

वाचा सविस्तर बातमी काय म्हटलं आहे संभाजीराजेंनी?
"छत्रपती शिवरायांचं स्मरण करून..."वडील शाहू महाराजांच्या 'त्या' दाव्यानंतर संभाजीराजेंचं ट्विट!
Sambhaji raje chhatrapati react on father shahu maharaj rajyasabha election

संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा निवडणुकीसाठीच्या अपक्ष उमेदवारीवरून राज्यातलं राजकारण तापलेलं असतानाच त्यांची वडील शाहू महाराज यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यांमुळे खळबळजनक दाव्यामुळे आता संभाजीराजे आणि शाहू महाराज यांच्यातच मतभेद असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. संभाजीराजेंची व्यक्तिगत उमेदवारी नाकारली घराण्याचा अपमान वगैरे झाल्याचा प्रश्नच येत नाही अशी प्रतिक्रिया शाहू महाराज यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे संभाजीराजेंचं ट्विट?

"छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे.माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही."

काय म्हणाले शाहू महाराज?

छत्रपती घराण्याचा या सगळ्यात अपमान वगैरे झाला असा काही प्रश्न येत नाही हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत काही विषय आला असता तर गोष्ट वेगळी होती. मात्र तसं काही झालं नाही. संभाजीराजेंना उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध आला नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली. संभाजीराजेंना माघार घ्यावी लागणं हा छत्रपतींच्या घराण्याचा अपमान आहे अशी चर्चा रंगू लागली होती त्याला आज शाहू महाराजांनी हे उत्तर दिलं आहे.

Sambhaji raje chhatrapati react on father shahu maharaj rajyasabha election
उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपतींना दिलेला शब्द फिरवला?; संजय राऊतांनी केला खुलासा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संभाजीराजेंनी भेट घेतली. त्यानंतर एक-ते दोन दिवसातच आपण अपक्ष लढू असं जाहीर केलं. देवेंद्र फडणवीस आणि संभाजीराजे यांच्यात काय चर्चा झाली ते मला माहित नाही. मात्र अर्धा तास चर्चा झाली याचा अर्थ काहीतरी विषय झाला असेलच. महाविकास आघाडीसोबत गेलात तर तुम्हाला पाठिंबा कसा देता येईल? त्यापेक्षा तुम्ही अपक्ष लढा आम्ही पाठिंबा देतो असं संभाजीराजेंना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असेल त्यामुळे ही त्यांचीच खेळी होती असं म्हणता येईल असंही शाहू महाराजांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत लढण्याबाबत संभाजीराजे ठाम होते. मात्र ही जागा शिवसेनेकडे असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना राज्यसभा निवडणूक शिवसेनेकडून लढा, पक्षात या असं म्हणत ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर संभाजीराजेंनी नाकारली. अपक्ष लढण्यावर ते ठाम राहिले. मात्र पाठिंबा मिळाला नाही हे म्हटल्यावर त्यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in