'...समीर वानखेडेंनी पहिल्या बायकोला धमकावलं होतं', मलिकांचा खळबळजनक आरोप

'...समीर वानखेडेंनी पहिल्या बायकोला धमकावलं होतं', मलिकांचा खळबळजनक आरोप
sameer wankhede implicates first wife cousin in fake drugs case nawab malik sensational allegation

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवार (18 नोव्हेंबर) सकाळी पत्रकार परिषद घेऊन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. मलिकांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाबाबत हा आरोप केला आहे. पहिल्या पत्नीने आपलं तोंड उघडू नये यासाठी वानखेडेने तिच्या चुलत भावाला ड्रग केसमध्ये अडकवलं. असा आरोप मलिकांनी केला आहे.

'पहिल्या पत्नीच्या चुलत भावाला ड्रग्स केसमध्ये अडकवलं'

नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत समीर वानखेडेंवर आरोप करताना असं म्हटलं की, 'घटस्फोटानंतर पहिल्या पत्नीने आपल्याविरुद्ध बोलू नये म्हणून वानखेडेंनी पत्नीच्या चुलत भावाला अडकवलं. ज्या पहिल्या पत्नीला यांनी घटस्फोट दिला होता तिच्याबाबत वानखेडेला भीती वाटत होती की, ही मुलगी आपल्याविरोधात कधीही उभी राहू शकते. त्यामुळेच वानखेडेने पहिल्या पत्नीच्या चुलत भावाच्या घरी एका पेडलरच्या माध्यमातून ड्रग्स प्लांट केले. त्यानंतर राज्य सरकारची जी एजन्सी आहे ANC यांच्यामार्फत त्याला अटक करविण्यात आली.'

'वानखेडेच्या पहिल्या पत्नीचा चुलत भाऊ हा अजूनहीी तुरुगांत आहे. तसेच वानखेडेकडून तिच्या घरच्यांना घाबरविण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. आमच्याविरोधात जबाब दिल्यास संपूर्ण कुटुंबाला ड्रग पेडलर बनवून जेलमध्ये टाकून देऊ. अशी धमकी त्याच्याकडून देण्यात आली होती. पण आता हळूहळू यांच्या सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत.' असा खळबळजनक आरोप यावेळी नवाब मलिक यांनी केला आहे.

'शेजाऱ्याच्या मुलालाही ड्रग्स प्रकरणात अडकवलं'

'समीर वानखेडे यांचे घोटाळे आता हळूहळू समोर येत आहेत. एक आयपीएस अधिकारी जो समीर वानखेडेंचा शेजारी होते. त्यांच्यासोबत त्यांचा काही वाद झाला होता. त्यानंतर वानखेडेकडून याच शेजाऱ्याचा मुलाला 27A मध्ये अडकविण्याचा प्रयत्न झाला.'

sameer wankhede implicates first wife cousin in fake drugs case nawab malik sensational allegation
'समीर वानखेडेंचा खरा जन्म दाखला 'असा' मिळवला', नवाब मलिकांनी नेमकं काय सांगितलं?

'याच मुलाचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की, कोणीही एनसीबीचा अधिकारी घरात आला नाही. घरातून मुलाला बाहेर बोलावण्यात आलं आणि खोट्या प्रकरणात 27A मध्ये अटक करण्यात आली. ज्या मुलाला अडकविण्यात आलं त्याचे वडील देखील आयपीएस अधिकारी आहेत. शेजाऱ्यांची वाद असेल तर तुरुंगात टाकण्याचा यांचा जो खेळ आहे हा आता उजेडात येत आहे.' असं म्हणत मलिकांनी गंभीर आरोप केले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in