NCB: समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ आरोपानंतर खात्यातंर्गत चौकशी सुरु

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) जे मुंबईतील ड्रग्स प्रकरणाच्या तपासानंतर प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आले. मात्र आता त्यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. कारण आता त्यांच्याविरुद्ध विजिलेन्स विभागाकडून चौकशीही सुरू झाली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांचं नेमकं भवितव्य काय? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, ‘समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांची खात्यातंर्गत चौकशी केली जात आहे.’ समीर वानखेडे हे पदावर कायम राहणार की नाही? या प्रश्नावर ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, ‘ते या पदावर कायम राहतील की नाही याबाबत आता सध्या तरी काहीही सांगता येणार नाही.’

दरम्यान, समीर वानखेडे यांना राजधानी दिल्लीतील एनसीबीच्या मुख्यालयात बोलावलं जाण्याची देखील शक्यता आहे. त्याच्याबाबत दिल्लीतील एनसीबीच्या मुख्यालयातही चर्चा सुरू आहे. ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की ते, चालू असलेल्या तपासावर देखरेख करत आहेत. चौकशी सुरू झाल्यामुळे ते या पदावर राहतील की नाही यावर काहीही बोलणे फार आताच घाईचे ठरेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मेलद्वारे एनसीबीवरील आरोपांबाबत DG NCB यांना एक सविस्तर अहवाल सादर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे आढावा बैठकीसाठी दिल्लीला पोहोचत आहेत. यादरम्यान डीजी सत्य नारायण प्रधानही एनसीबीवरील आरोपांवर समीर वानखेडेंशी बोलणार असल्याचं समजतं आहे.

सत्र न्यायालयात NCB चे नवीन प्रतिज्ञापत्र

ADVERTISEMENT

रविवारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर एनसीबीने आता सत्र न्यायालयात नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यामध्ये समीर वानखेडेच्या वतीने सांगण्यात आले आहे की, ‘या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच मला टार्गेट केले जात आहे. माझे कुटुंब, माझी मृत आई-वडील यांना टार्गेट केले जात आहे.’

ADVERTISEMENT

पुढे असे म्हटले गेले आहे की, ‘या प्रकरणाच्या तपासावर अडचण निर्माण केली जात आहे, तसेच माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’

बनावट छापे, खंडणीचे आरोप

क्रूज पार्टीशी संबंधित ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही एनसीबीने पकडले होते. ज्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी हा छापाच बनावट असल्याचा आरोप केला होता. यानंतर, या प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकरने भ्रष्टाचाराची बाब सांगितली होती.

नवाब मलिक यांनी आधीही आरोप केले होते की, समीर वानखेडे हे सिने इंडस्ट्रीमधील लोकांकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करतात.

Exclusive : मी समीर वानखेडेंना ओळखत नाही, त्यांना टीव्हीवर पाहिलं आहे-के.पी. गोसावी

दुसरीकडे प्रभाकर साईल यांनी असा आरोप केला आहे की, एनसीबी कार्यालयात त्यांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या होत्या आहे. त्याचवेळी केपी गोसावी यांनी आर्यनच्या सुटकेसाठी 25 कोटींची मागणी केल्याचा आरोप देखील केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT