'समीर वानखेडे तुमची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात आहे का?, उत्तर द्या', मलिकांचा खळबळजनक आरोप
sameer wankhedes sister in law harshada redkar drugs business nawab malik allegations tweet pune court kranti redkar

'समीर वानखेडे तुमची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात आहे का?, उत्तर द्या', मलिकांचा खळबळजनक आरोप

Nawab Malik allegations: नवाब मलिक यांनी क्रांती रेडकर हिची बहीण हर्षदा रेडकरबाबत काही गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)हे गेले अनेक दिवस एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede)यांच्यावर एकामागून एक आरोप करत आहेत. असं असताना सोमवारी (8 नोव्हेंबर) नवाब मलिक यांनी एक नवं ट्विट करुन पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. यावेळी मलिक यांनी समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्स व्यवसायात आहे का? असा थेट सवाल विचारला आहे.

समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर (Harshada Dinanath Redkar) ही ड्रग्जच्या व्यवसायात गुंतली आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर या प्रकरणातील एक केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे. असं देखील नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे.

नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? तुम्ही याबाबत उत्तर दिलंच पाहिजे कारण तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे. हा पुरावा आहे.' असं ट्विट करत मलिक यांनी संबंधित केसबाबतचे काही कागदपत्र ट्विटरवर शेअर केले आहेत.

दरम्यान, आता नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आलेल्या या आरोपांना अभिनेत्री क्रांती रेडकर उत्तर देण्याची शक्यता आहे. कारण की, क्रांती आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहे. त्यावेळी ती मलिक यांच्या आरोपाला उत्तर देणार आहे.

sameer wankhedes sister in law harshada redkar drugs business nawab malik allegations tweet pune court kranti redkar
Kranti Redkar: समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरबद्दल तुम्हांला या गोष्टी माहिती आहेत का?

दुसरीकडे समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandeo Wankhede) यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात 1.25 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. हायकोर्टात हा दावा दाखल करण्यात आला आहे. पण असं असताना देखील नवाब मलिक यांच्याकडून वानखेडेंवर आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर सातत्याने नवनवे आरोप हे केले जात आहेत.

नवाब मलिकांनी कालच्या पत्रकार परिषदेत काय केले होते आरोप?

'समीर वानखेडे हा खोटारडा माणूस आहे. ड्रग्ज पेडलर्सना अभय देणं आणि ट्रॅपमध्ये हायप्रोफाईल लोकांना अडकवणं आणि त्यांच्याकडून खंडणी गोळा करणं हा समीर वानखेडेंचा उद्योग आहे. माझा लढा एनसीबीविरोधात नाही. माझा लढा भाजपविरोधात नाही. माझा लढा या माणसाविरोधात आहे.'

'अस्लम शेख यांनाही पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. काशिफ खान हा अस्लम शेख यांना पार्टीत येण्यासाठी आग्रह करत होता. 'उडता पंजाब'नंतर 'उडता महाराष्ट्र' करण्याचा कट होता.' असा आरोप नवाब मलिक यांनी काल (7 नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला होता.

'शाहरुख खानलाही समीर वानखेडेंनी धमकावलं होतं. 'नवाब मलिकांनी बोलणं थांबवलं नाही तर तुझा मुलगा दीर्घ काळ तुरुंगात राहिल.' या आशयाची धमकी समीर वानखेडेंनी दिली होती.' असाही आरोप नवाब मलिकांनी केला होता.

'या पार्टीला अस्लम शेख यांना काशिफ खान का घेऊन जाणार होता? मंत्र्यांच्या मुलांना का ट्रॅप करत होता? कट रचून ड्रग्जचा खेळ सरकार चालवत आहे. अशी बदनामी करण्याचा हा डाव होता. असा दावा करतानाच अस्लम शेखही हे सुद्धा या प्रकरणाची माहिती देतीलच. आता या प्रकरणाची मुंबईच्या एसआयटीनेही चौकशी केली पाहिजे.' अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in