'...आणि हुकूमशाहीचा उदय होतो'; वाजपेयींना अभिवादन करताना राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी संजय राऊतांनी एक पोस्ट करत अप्रत्यक्षपणे मोदी सरकारकडून विरोधकांना दिल्या जात असलेल्या वागणुकीवर भाष्य केलं...
'...आणि हुकूमशाहीचा उदय होतो'; वाजपेयींना अभिवादन करताना राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार संजय राऊत.

मोदी सरकारकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि विरोधी पक्षाची सरकारं असलेल्या राज्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न होतोय, असा सातत्याने आरोप करणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीकेचा बाण डागला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी एक पोस्ट शेअर करत राऊतांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आज साजरी केली जात आहे. जयंतीनिमित्ताने राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन केलं जात आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनीही अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी एक पोस्ट शेअर केली आहे.

पोस्टमधील ओळी स्वतः अटलबिहारी वाजपेयी यांच्यांच असून, सध्या देशात आणि राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी ही पोस्ट रिट्विट केल्याचं दिसत आहे.

काय आहेत ओळी?

'जिथे विरोध आणि विरोधकांना देशद्रोही समजण्याची वृत्ती असते, तिथे लोकशाही संपते आणि हुकुमशाही सुरू होते', असं वाजपेयी यांच्या ओळी असून, ही पोस्ट संजय राऊत यांनी रिट्विट करत अप्रत्यक्षपणे मोदी सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी रिट्विट केलेली पोस्ट.
संजय राऊत यांनी रिट्विट केलेली पोस्ट.

संजय राऊतांकडून सातत्याने टीका

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत 12 खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली होती. त्यानंतर वाढत्या महागाईवरूनही संजय राऊतांनी टीका केली होती. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगेत स्नान केल्याची चर्चा झाली. यावरही राऊतांनी देशातील प्रश्न गंगेत अंघोळ केल्यानं संपणार नाहीत. सरकार महागाई रोखण्यासाठी काय करणार अशा आशयाची टीका केली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in