'अजुनी यौवनात मी, आयुष्य स्वप्न बघण्यात जावो', राऊतांनी फडणवीसांना डिवचलं

sanjay raut criticism to devendra fadnavis: मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी मिश्किल टोलेबाजी केली आहे.
'अजुनी यौवनात मी, आयुष्य स्वप्न बघण्यात जावो', राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
sanjay raut criticism to devendra fadnavis on chief ministers post statement

पुणे: 'मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे.', असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (12 ऑक्टोबर) एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केलं होतं. यावरुनच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना डिवचलं आहे. 'फडणवीसांचं आयुष्य हे स्वप्न पाहण्यातच जावं', असा मिश्किल टोला संजय राऊत यांनी हाणला आहे. संजय राऊत हे सध्या पुणे दौऱ्यावर असून पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर ही प्रतिक्रिया दिली आहे.

'मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे.' असं फडणवीस म्हणाले होते. ज्यानंतर राजकीय वर्तुळातून याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. याबाबतच सजंय राऊत यांना देखील त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा संजय राऊतांनी यावर बोलताना जोरदार फटकेबाजी केली आहे.

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

'कधीकधी लोकांना वाटतं की, अजुनी यौवनात मी.. असं एक नाटक फार गाजलंय रंगमंचावर. ते नाटक चिरतरुण नाटक होतं. असं अनेकांना वाटतं.. की अजुनी यौवनात मी.. अजुनी मुख्यमंत्री.. आम्हालाही कधीकधी दिल्लीत गेल्यावर वाटतं की, आमचाच पंतप्रधान होणार.'

'स्वप्नात रममाण व्हावं माणसाने, चांगली स्वप्नं पाहावीत. स्वप्नांना, पंखांना बळ असावं. त्यांच्या पंखात अधिक ताकद येवो.. स्वप्न पाहण्यासाठी आणि अधिक उडण्यासाठी. अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांचं आयुष्य हे स्वप्न बघण्यात जावो.' असं म्हणत राऊतांनी फडणवीसांना बरेच टोले हाणले.

sanjay raut criticism to devendra fadnavis on chief ministers post statement
मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतं....- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलेलं?

'पाटीलसाहेब आणि गणेश नाईक आहेत. तुमच्यासारखे नेते पाठिशी असल्याने मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही तो काय करतो हे महत्त्वाचं आहे.'

'गेले दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिलेलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. विरोधी पक्षनेता म्हणून काम करतो आहे. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी आशीर्वाद घ्यायला इथेच येणार आहे' असं फडणवीस म्हणाले होते.

नवी मुंबईत महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in