
शरद पवार यांनी आत्तापर्यंत केलेल्या भाषणांचं संकलन करून 'नेमकेची बोलणे' या पुस्तकाचं प्रकाशन आज मुंबईत करण्यात आलं. या कार्यक्रमाला विजय केळकर, रंगनाथ पाठारे, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार या सगळ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात संजय राऊत यांनी भाषणाला उभं राहिलेले असतानाच आज तुमच्या विचारांनाच आम्ही भगवं कव्हर घातलंय असं म्हटलं ज्यामुळे एकच हशा पिकला. अत्यंत खुमासदार शैलीत संजय राऊत यांनी भाषण केलं.
काय म्हणाले संजय राऊत?
'पवारसाहेबांच्या विचारानांच आम्ही भगवं कव्हर घातलं आहे. शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा जो ग्रंथ लिहिला आहे त्याचा हा रंग आहे. हे सरकार बेरंग नाही. उलट अवघा रंग एकची झाला असं हे सरकार आहे' असं संजय राऊत पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात म्हणाले आणि एकच हशा पिकला. आम्ही कुठल्याही रंगला भुलत नाही. भगवा हा महाराष्ट्राचा रंग आहे, महाराष्ट्र धर्माचा रंग आहे असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
'आज प्रकाशित करण्यात आलेलं पुस्तक ही एक अभिनव कल्पना आहे. त्यांच्या भाषणांचं वाचन आज अनेकांनी केलं. सुधीर भोंगळे यांनी एक ऐतिहासिक काम या पुस्तकाच्या निमित्ताने केलं आहे. नेमकेची बोलणं हे पुस्तकाचं शीर्षकही उत्तम आहे. हे पुस्तक आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं पाहिजे. महाराष्ट्र हा देशाला विचार देत असतो. शरद पवार हे देखील देशाला विचार देत असतात. यामध्ये शरद पवारांची 61 भाषणं आहेत ही प्रत्येकाने वाचली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे पुस्तक भेट देऊ. नेमकेची बोलणं काय असतं ते आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना समजावून सांगू'
25 वर्षांपूर्वी शरद पवारांनी सांगितलं होतं की भाजपला ऐक्य नकोय. आम्हाला ते दोन वर्षांपूर्वीक ळलंय. ते आधीपासूनच सांगत होते की भाजपला देशाचे तुकडे करायचे आहेत. आम्हाला ते उशिरा कळलं
संजय राऊत, खासदार, शिवसेना
मला पुस्तक काही संपूर्ण वाचता आलं नाही. पण सहा-सात प्रकरणं वाचून दाखवली गेली. त्यामुळे थोडंसं वाचनही इथे झालं. बाळासाहेब ठाकरेंना शेवटी शेवटी आम्ही पुस्तकं, वर्तमानपत्रं वाचून दाखवत होतो. ते ऐकण्यातही एक वेगळी मजा असते. मी शरद पवारांना दिल्लीत खुर्ची बसायला दिली तेव्हा अनेकांनी माझ्यावर टीका केली. मी पवारसाहेबांना खुर्ची का दिली? हे समजून घ्यायचं असेल तर त्यांनी 61 भाषणं वाचली पाहिजेत असंही संजय राऊत म्हणाले. काही टीकाकार अत्यंत विकृत पद्धतीने टीका करत होते. त्यांनी हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना कळेल की माझ्यासराख्या एका सामान्य कार्यकर्त्याने त्यांना खुर्ची दिली आहे.
25 वर्षांपूर्वी शरद पवारांनी सांगितलं होतं की भाजपला ऐक्य नकोय. आम्हाला ते दोन वर्षांपूर्वीक ळलंय. ते आधीपासूनच सांगत होते की भाजपला देशाचे तुकडे करायचे आहेत. आम्हाला ते उशिरा कळलं असंही संजय राऊत म्हणाले.