'त्यांनी' थोडा हात दिला असता तर आपले आढळराव आज लोकसभेत असते'
Sanjay Raut in pimpri chinchwad and pune(फाइल फोटो)

'त्यांनी' थोडा हात दिला असता तर आपले आढळराव आज लोकसभेत असते'

Sanjay Raut in pimpri chinchwad and pune: संजय राऊत यांनी शिवसेनेला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये यश मिळत नसल्याची खंत बोलून दाखवली आहे.

पिंपरी-चिंचवड: 'भोसरी मतदारसंघाने थोडा हात दिला असता तर आपले आढळराव आज लोकसभेत असते.' असं म्हणत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या लोकसभेतील पराभवाबाबत खंत व्यक्त केली. ते पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले.

राज्यात आपली सत्ता आहे आणि मुख्यमंत्री देखील आपलेच आहेत असं असताना पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या शहरात देखील आपलेच महापौर असले पाहिजे असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारण्याचा प्रयत्न केला.

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

'महानगरपालिकेत भोसरीतून आपला एकही नगरसेवक नाही. भोसरी मतदार संघाने थोडा हात दिला असता तर आपले आढळराव आज लोकसभेत असते. राज्यात महाआघाडी आहे त्यात सगळ्यांना थोडं-थोडं मिळावी. त्यात आपल्यालाही काही तरी मिळालं पाहिजे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आपला भगवा फडकू शकलेला नाही याची आपल्याला खंत असायला हवी.'

'महानगरपालिकेत स्वबळावर आपली सत्ता येईल अशी ताकद आहे. पिंपरी-चिंचवड हा संमिश्र भाग आहे. त्यांच्यापर्यंत आपण पोहचलं पाहिजे. शिवसेनेचं काम पोहचलं पाहिजे. येथील काही नेते 10-10 नगरसेवक निवडून आणू शकतात. हे जर प्रत्येकाने ठरवलं की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे तर माझ्या शहराचा महापौर मला शिवसेनेचा हवा आहे तर ते शक्य आहे. शिव सेनेच पिंपरी-चिंचवडमध्ये 100 नगरसेवक निवडून यावे असं मी कधी म्हणणार नाही. 55 असून आपला मुख्यमंत्री आहे. त्यामुळे एवढे नगरसेवक निवडून यावेत की महापौर हा शिवसेनेचाच व्हायला हवा.'

'तुम्हाला एक सांगतो.. भीती वैगरे बाळगायचं कारण नाही. की, भाजप काय करेल... काय करणार ते.. किंवा पालकमंत्र्यांचा इथे जास्त दरारा आहे.. अहो आमचाही दरारा आहे. तुम्ही छाती पुढे करुन जा ना.. सत्ता आहे म्हणून..'

'महाराष्ट्रातील सत्ता आपली आहे. ती फक्त पद आहे म्हणून नाही. प्रत्येक शिवसैनिकाच्या मनगटात जी ताकद आहे त्याला सत्ता म्हणतात. पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता आणायची असेल तर भोसरीमध्ये आपल्याला खूप जोरदार काम करावं लागेल.' असं जोरदार आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केलं आहे.

Sanjay Raut in pimpri chinchwad and pune
शिवसैनिकांना स्वबळाच्या तयारीचे आदेश, अजित पवारांना सूचक इशारा; संजय राऊत म्हणतात...

'आता पुढे काय होईल. आपली आघाडी होईल का? नाही झाली तर... त्या भानगडीत कशाला पडायचं आपण. आपल्याला एकट्याने लढण्याची जास्त सवय आहे. आपण सगळ्या जागांवर लढण्याचा प्रयत्न करू. आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय. उद्या आपल्यासोबत चर्चेला बसतील. आपण सन्मानाने आघाडी करण्याचा प्रयत्न करू. पण स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी आपण तडजोड करणार नाही, हे लक्षात घ्या', असं शिवसैनिकांना सांगतानाच राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक इशारा देखील दिला आहे.

Related Stories

No stories found.