‘राणे तुला पूर्ण नागडा करीन…’, राऊतांच्या संयमाचा स्फोट; काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sanjay Raut venomous criticizing narayan rane: मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर प्रचंड जहरी टीका केली आहे. यावेळी संजय राऊत प्रचंड संतापलेले दिसून आले. ‘नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस.. झालं आता. मी कालपर्यंत गप्प होतो. यापुढे जर तो बोलत राहिला तर मी त्याला पूर्ण नागडा करेन.’ अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी यावेळी केली आहे. (sanjay rauts burst of patience criticizing narayan rane with venomous words what exactly happened)

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

‘अरे पादरा पावटा रे तो.. बाळासाहेबाच्या भाषेत.. पादरा आहे तो आतापर्यंत मी त्याच्याविषयी काही बोललो नाही. सगळ्यांना अरे-तुरे करतो. हा कोण आहे? मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे… कालपर्यंत एकनाथ शिंदेंना अरे-तुरे करत होता. जुने काढा व्हिडीओ… मोदींना अरे-तुरे.. हे कोण आहेत. याची चौकशी करा. आता मी करणार..’

‘कालपर्यंत मी संयमाने वागलो, इतके वर्ष मी संयमाने वागलो. पण तुम्ही जर रोज आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आम्ही सगळे फडणवीस, अशोक चव्हाण, अहमद पटेल, सोनिया गांधी त्यानंतर मोदी सगळ्यांवर अरे-तुरे.. कोण तुम्ही’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘…आणि मग मी दाखवतो’, संतापलेल्या संजय राऊतांचं नारायण राणेंना चॅलेंज

‘डरपोक लोकं तुम्ही… तुम्ही पळून गेलात.. तुमच्या किरीट सोमय्याने तुमच्यावर जे आरोप केलेत त्यावर उत्तर दिलंत का तुम्ही? कुठेही किरीट सोमय्या आता. तुमच्या 100 बोगस कंपन्या आणि इतर सगळं बाहेर काढतो आता मी.’

ADVERTISEMENT

‘काय म्हणताये तुम्ही.. कोणता अग्रलेख.. वाचा नीट आणि परत सांगतो.. नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस.. झालं आता. मी कालपर्यंत गप्प होतो. आज तू मर्यादा सोडलेली आहेस. तुझ्यासारखे आले 56 आणि गेले.. नामर्द माणूस आहेस तू पळून गेलास. ईडी आणि सीबीआयच्या भीतीने.’

ADVERTISEMENT

‘तू काय सांगतो रे आम्हाला लढाईच्या गोष्टी रे.. तुझी लायकी आहे का?.. चल’

‘हा राऊत वि. राणे हा संघर्ष वैगरे काही नाही. त्याला वेड लागलंय. तो वेड्यांच्या कळपात आहे तो. त्याची सटकलीय.. त्या नारायण राणेची. मी कालपर्यंत त्याचा आदराने उल्लेख करत होतो. जरी तो आमच्यावर टीका करत होता. मी त्याच्यावर एक शब्द बोललो नाही. पण कोण आहे हा माणूस.’

‘डरपोक माणूस.. याचं मंत्रिपद जातंय. शिंदे गटाच्या माणसांना सामावून घेण्यासाठी नारायण राणेचं मंत्रिपद जातंय म्हणून तो भैसाटलाय.’

‘अजित पवारांनी फार समर्पक उपमा दिली आहे. यांची बुद्धी तेवढीच आहे टिल्ली. हा प्रश्न टिल्ल्या शरीरयष्टीचा नसून टिल्ल्या बुद्धीचा आहे. मी अशाप्रकारची भाषा कधी वापरत नाही. पण आता वापरलीए. याला जबाबदार सर्वस्वी नारायण राणे हा माणूस आहे. यापुढे जर तो बोलत राहिला तर मी त्याला पूर्ण नागडा करेन. ये… तुझी पोरं येतायेत तर पोरांना येऊ दे.. तू येतोस तर तू ये. ये मैदानात. साला केंद्र सरकारची सुरक्षा घेऊन फिरतोय. हिंमत आहे तर फिर ना एकटा.. मोठा भाई समजतो स्वत:ला.. चल.’ अशी अत्यंत जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊतांचा एवढा पारा का चढला?

26 डिसेंबर रोजी सामनात जो अग्रलेख छापून आला होता तो नारायण राणेंच्या प्रचंड जिव्हारी लागला होता. त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना राणेंनी संजय राऊतांवर पलटवार केला होता.

त्यावेळी नारायण राणे म्हणाले होते की, ‘नारायण राणेंवर बोललं की, ब्रेकिंग न्यूज होते. माझ्याकडे कात्रणं आहेत. मी वाचून विसरणारा नसून दखल घेणारा आहे. एक-एक वाक्य माझ्या लक्षात आहे. माझा वाईट स्वभाव आहे. 26 डिसेंबरचा अग्रलेख मी राखून ठेवला आहे. संजय राऊत यांना सोडणार नाही.’

‘मी सुद्धा त्यांच्यावर केस टाकणार आहे. 100 दिवस आत राहिले, आता त्यांना वाटतं परत आत जावं. मी रस्ता मोकळा करत आहे परत जाण्यासाठी.’ अशी टीका नारायण राणेंनी संजय राऊतांवर केली होती.

शिंदे गटाचे अर्धे लोक भाजपमध्ये जातील, त्यांच्याकडे… -संजय राऊत

‘त्या’ अग्रलेखात नेमकं काय म्हटलं होतं?

नागपूर भूखंड प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एखादी ‘एसआयटी’ नेमली असती तर श्री. फडणवीस यांचे चरित्र उजळून निघाले असते, पण गाडलेले विषय उकरून त्याबाबत ‘एसआयटी’ वगैरे निर्माण केल्या जात आहेत. आमदार महेश शिंदे म्हणताहेत, ‘‘आम्ही खोके घेतले.’’ मग हा चौकशीचा विषय ठरू नये? आश्चर्यच आहे. सिंधुदुर्गात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात. या तिन्ही खुनांच्या तपासासाठी श्री. फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील तर कोकणातले 100 सांगाडे ‘पुरावे’ म्हणून त्या एसआयटीसमोर स्वतःच हजर होतील, पण श्रीमान फडणवीस ते करणार नाहीत.

असं 26 डिसेंबरच्या अग्रलेखात म्हटलं होतं. यावरुनच राणेंनी राऊतांवर निशाणा साधला होता. ज्यानंतर आता संजय राऊतांचा संयम ढळला आणि त्यांनी राणेंचा खरपूस समाचार यावेळी घेतला. आता संजय राऊतांच्या या जहरी टीका

    follow whatsapp

    ADVERTISEMENT