'मुस्लिम आहेस मग मंदिरात काय करते आहेस?' केदारनाथला गेल्याने सारा अली खान प्रचंड ट्रोल

वाचा नेमकं काय घडलं ?
'मुस्लिम आहेस मग मंदिरात काय करते आहेस?' केदारनाथला गेल्याने सारा अली खान प्रचंड ट्रोल

अभिनेत्री सारा अली खान ही प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे. ती अनेकदा तिचे विविध पोझमधले फोटो इंस्टापेजवर पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान केदारनाथला गेली होती. तिच्यासोबत अभिनेत्री जान्हवी कपूरही होती. दोघींनीही केदारनाथ मंदिराबाहेरचा फोटो पोस्ट केला. ज्यानंतर नेटकऱ्यांनी साराला ट्रोल करण्यास सुरूवात केली.

(फोटो सौजन्य: Instagram)

काय आहे प्रकरण?

सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघीही केदारनाथला गेल्या होत्या. केदारनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे. साराने या ठिकाणी मंदिरातला फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये साराने आणि जान्हवीने कपाळाला गंध लावलेलं दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोत ती दर्शन घेताना दिसते आहे. झालं नेटकऱ्यांनी यावरूनच साराला प्रचंड ट्रोल करण्यास सुरूवात केली.

काही नेटकऱ्यांनी या दोघींचं कौतुक केलं. पण नंतर ट्रोल करणाऱ्या कमेंटनी सारा अली खानच्या इंस्टा पोस्टचा इनबॉक्स भरू लागला. एका युझरने म्हटलंय 'तू मुस्लिम आहेस, तू हे काय करते आहेस?' आणखी एका व्यक्तीने लिहिलं आहे की 'तुझ्यासारख्या मुस्लिमांची लाज वाटते, तुझ्यासारख्या व्यक्ती मुस्लिम होऊही शकत नाहीत.' आणखी एक युझर म्हणाला 'सारा मी तुझा तिरस्कार करतो, तू सारा खान आहे.. तू मुस्लिम आहेस तू हे सगळं करण्यापेक्षा तुझं नाव का बदलून घेत नाहीस?'

याआधी म्हणजेच 22 ऑक्टोबरला सारा अली खानने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळीही ट्विटरवरही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. सारा अली खानने पहिला चित्रपट केला त्याचं नाव केदारनाथ होतं. सुशांत सिंग राजपूत हा तिचा या सिनेमातला नायक होता. आता याच केदारनाथला आल्याने साराला ट्रोल व्हावं लागतं आहे. युझर्सने तिला नको नको त्या शब्दात सुनावलं आहे आणि तुझा धर्म मुस्लिम आहे हे विसरू नकोस असंही म्हटलं आहे.

सारा अली खान आता अतरंगी रे या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार आणि धनुष हे तिचे सहकलाकार आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in