२५ मतदारांनी तुम्हाला का डावललं, स्वतःचा काहीच दोष नाही का? शिवेंद्रराजेंनी शिंदेंना सुनावलं

'पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडणं सोपं, शिंदेंनी आत्मचिंतन करावं'
२५ मतदारांनी तुम्हाला का डावललं, स्वतःचा काहीच दोष नाही का? शिवेंद्रराजेंनी शिंदेंना सुनावलं

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंचा झालेल्या पराभवामुळे राजकारण चांगलंच रंगात आलंय. पराभवासाठी शिंदेंनी नाव न घेता शिवेंद्रराजेंना जबाबदार धरत आपल्याला निवडणूकीत पाडण्यामागे मोठं कारस्थान झाल्याचं सांगितलं. शिवेंद्रराजेंनीही शशिकांत शिंदेंना शालजोडीतले लगावत आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे.

दुसऱ्यावर पराभवाचं खापर फोडणं सोपं असतं, पण पराभव का झाला याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. पंचवीस मतदारांनी तुम्हाला का डावललं? यामध्ये स्वतःचा काहीच दोष नाही का? तुमच्या काहीही चुका झाल्या नाहीत का...शशिकांत शिंदेंनी याचा अभ्यास करुन आत्मचिंतन करावं. तुम्ही अॅक्शनला रिअॅक्शन येणारचं असं म्हणत शिवेंद्रराजेंनी शिंदेंना टोला लगावला आहे.

२५ मतदारांनी तुम्हाला का डावललं, स्वतःचा काहीच दोष नाही का? शिवेंद्रराजेंनी शिंदेंना सुनावलं
सातारा जिल्हा बँक निवडणूक : रांजणे छोटे कार्यकर्ते, बोलवता धनी वेगळा - शशिकांत शिंदेंची टीका

पराभव झाला की दुसऱ्यावर खापर फोडायचं आणि निवडून आलो की स्वतःच्या हिमतीवर निवडून आलो असं दाखवायचं. यात षडयंत्र वगैरे काही नाही. मी स्वतः भाजपमध्ये असूनही सहकार पॅनलसोबत राहिलो आणि पॅनलमधील सर्वांना जास्तीत जास्त मत कशी मिळतील हे पाहिलं. कोणाला जावळीत लक्ष घालायचं असेल तर खुशाल घालावं. मी इथला आमदार आहे, माझे असंख्य कार्यकर्ते आहे, मला फरक पडत नाही असं म्हणत शिवेंद्रराजेंनी शिंदेंचे आरोप फेटाळून लावले आहेत.

२५ मतदारांनी तुम्हाला का डावललं, स्वतःचा काहीच दोष नाही का? शिवेंद्रराजेंनी शिंदेंना सुनावलं
सातारा: राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेही थिरकले!

Related Stories

No stories found.